शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
Top Marathi News LIVE Updates: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
3
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
4
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
5
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
6
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
7
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
8
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
9
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
10
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
11
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
12
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
13
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
14
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
15
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
16
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
17
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
18
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
19
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
20
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूल हवामानाने धानपीक रोगग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना रबी आणि उन्हाळी पिकापासून आशा आहे. परंतु प्रतीकुल हवामानामुळे धान पीक संकटात सापडले असून भूजल पातळीही खालावली आहे. उन्हाळी धानाची ९० टक्के रोवणी पूर्ण झाली. मात्र हवामान पोषक नसल्याने कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकारी शेताच्या बांधावर पोहचत असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.

शेतकरी चिंतेत : कृषी अधिकारी शेतशिवारात, फवारणीच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : खरीप हंगामात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला. आता शेतकऱ्यांना रबी आणि उन्हाळी पिकापासून आशा आहे. परंतु प्रतीकुल हवामानामुळे धान पीक संकटात सापडले असून भूजल पातळीही खालावली आहे. उन्हाळी धानाची ९० टक्के रोवणी पूर्ण झाली. मात्र हवामान पोषक नसल्याने कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकारी शेताच्या बांधावर पोहचत असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.
दिवाळीपासून सतत पाऊस, ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण कीडीला पोषक आहे. सद्यस्थितीत पालांदूर परिसरात उन्हाळी धानावर खोडकीड, करपाचा प्रादूर्भाव वाढला आहे. २०-२५ दिवसाच्या रोवणीला दोनवेळा फवारणी करूनही सुधारणा दिसत नाही. चुलबंध खोऱ्यात धानाची ५२३ हेक्टरवर लागवड झाली असून लाखनी तालुक्यात १७५२ हेक्टर रोवणी झाली आहे. एकट्या पालांदूरात हे क्षेत्र ४७ हेक्टर आहे. भाजीपाल्याचेही मोठे पीक या परिसरात घेतले जाते. धानासोबतच वातावरणातील बदलाचा परिणाम भाजीपाल्यावर होत आहे. बाजारात धानाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांची भीस्त उन्हाळी धानावर आहे. परंतु प्रतिकुल हवामान शेतकºयांना चिंतेत टाकत आहे.
शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकारी शेताच्या बांधावर पोहचले आहे. कृषी मंडळ अधिकारी गणपती पांडेगावकर म्हणाले, धानाचे पीक वेळीच निंदन व खुरपन करू घ्यावे, अपेक्षित खताच्या मात्रा द्याव्या, कृषी सल्ल्यानुसारच खत टाकावे, कृषी निविष्ठांचे पक्के बिल द्यावे, असे आवाहन केले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकºयांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच फवारणी करावी, असे त्यांनी सांगितले.

तापमानात अनपेक्षित बदल
दिवस व रात्रीच्या तापमानात अनपेक्षित बदल जाणवत आहे. धानाला उष्ण हवामानाची गरज आहे. मात्र दुपारी उन्ह आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवत आहे. खोडकीडीचेही आक्रमण झाले आहे. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकरी पुढे सरसावले आहे.

शेतकºयांनी रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून दशपर्णी अर्क, निंबोळी अर्काची फवारणी करावी. धानात खूप पाणी साठवून ठेवू नये, अधिक माहितीसाठी कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
-पद्माकर गिदमारे,
तालुका कृषी अधिकारी लाखनी.

टॅग्स :agricultureशेती