शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धानाच्या बोनसचे २१३ कोटी १२ लाख आले ! शासनाने पुढच्या हंगामात बोनसची राशी वाढवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:42 IST

Bhandara : जिल्हा पणन कार्यालयाकडे रक्कम जमा, लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : गत खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपयांप्रमाणे प्रोत्साहनपर राशी राज्य शासनाने जिल्हा पणन कार्यालयाकडे वळती केली आहे. राज्यातील १० जिल्ह्यांतील धान उत्पादकांना यातून मोठा दिलासा मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे २१३ कोटी, १२ लाख १५ हजार, दोनशे रुपये जमा झाले आहेत. रक्कम लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

धान उत्पादन खर्च वाढल्याने व धानाची शेती तोट्यात असल्याची ओरड झाल्यानंतर सरकारकडून धान उत्पादकांना प्रोत्साहनपर राशीचे नियोजन गत काही वर्षापासून केले जात आहे. दरवर्षी प्रतिहेक्टरी नुकसानभरपाई मिळते. गत खरीप हंगामातील नजर अंदाज आणेवारी लक्षात घेता शासनाने हिवाळी अधिवेशनात प्रतिहेक्टरी २० हजार रुपये अनुदान अर्थात बोनस घोषित केला. ती रक्कम सहा महिन्यानंतर जिल्हा मार्केटिंग कार्यालयाच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. 

कोल्हापूरनंतर जिल्ह्याला बोनसची सर्वाधिक राशीबोनसच्या रूपाने धान उत्पादक जिल्ह्यात सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्याला निधी वळता करण्यात आला आहे. त्यानंतर जिल्ह्याचा क्रमांक लागला आहे. धान उत्पादित करणे दिवसेंदिवस जिकिरीचे व महागाईचे होत आहे.

उत्पादन मूल्य वाढीकडे लक्ष द्याधानाला चालू हंगामात २३६९ रुपयांचा दर ठरवून दिला आहे. उत्पादन खर्चाचा विचार करता हा दर अत्यल्प ठरत आहे. शासनाने किमान ३ हजार रुपयांपर्यंत दर देणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने ती मागणी अपुरी ठेवली आहे.

"जिल्हा पणन कार्यालयाला शासनाकडून प्रोत्साहित राशी जमा झालेली आहे. धान खरेदी केंद्राकडून हुंड्या प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम ऑनलाइन पद्धतीने पाठविण्याची व्यवस्था केली जाईल."- एस. बी. चंद्रे, जिल्हा पणन अधिकारी 

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा