पुरकाबोडी, येटेवाही जंगलात वाघाच्या पाऊलखुणा
By Admin | Updated: July 26, 2016 00:41 IST2016-07-26T00:41:28+5:302016-07-26T00:41:28+5:30
भंडारा जिल्ह्यातील कऱ्हांडला राष्ट्रीय प्रकल्पातून १९ मे पासून जिल्ह्यातील सर्वच अभयारण्य पिंजूनही ‘जय’चा थांगपत्ता नाही.

पुरकाबोडी, येटेवाही जंगलात वाघाच्या पाऊलखुणा
जय तर नसावा ना : घटनास्थळावर जनावर मृतावस्थेत
चिचाळ : भंडारा जिल्ह्यातील कऱ्हांडला राष्ट्रीय प्रकल्पातून १९ मे पासून जिल्ह्यातील सर्वच अभयारण्य पिंजूनही ‘जय’चा थांगपत्ता नाही. मात्र चिचाळ येथील माजी सरपंच मुनीश्वर काटेखाये हे लाखनी वरून चिचाळ येथे कुटुंबीयांसह येत असताना रात्रीच्या सुमारास पुरकाबोडी तिर्री मार्गावर चार फुट उंचीचा पट्टेदार वाघ रस्त्याच्या कडेला त्यांना दिसला. काटेखाये यांनी कऱ्हांडला अभयारण्यात दिसलेला वाघ हा ‘जय’च असावा का? या दिशेने वनविभागाचा तपास सुरू आहे.
चिचाळ येथील माजी सरपंच मुनीश्वर काटेखाये हे लाखनी वरून कुटुंबियांसोबत येत असताना पुरकाबोडी ओढ्याशेजारी पट्टेदार वाघ रस्त्याच्या कडेला दिसला. २० जुलैच्या रात्री खापा जंगलातील मुख्य रस्त्यावर रात्री १.१५ त्यांना हरणाचा कळप दिसला. त्यामुळे या जंगलात वाघ असल्याची माहिती त्यांनी अड्याळचे वनक्षेत्राधिकारी प्रमोद महेशपाठक यांना दिली. काटेखाये व्याघ्र स्वरक्षण दलाचे वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.पी. चंद्रात्रे व यांच्यासोबत वन्यजीवप्रेमी शाहीद खान यांनी घटनास्थळाला भेट दिली.
काटेखाये यांनी सांगितलेल्या ठिकाणी वाघाचे छावे व ज्या ठिकाणी हरिण व रानडुक्कर दिसले तिथे मृतावस्थेत डुक्कर व मृत गायीचे सापळे, वाघाने अलिकडे केलेली लघुशंका आढळून आली. सदर वाघ ताडोबा, नागझिरा, न्यू नागझिरा, उमरेड, कऱ्हांडला, कोका अभयारण्यात शोधूनही सापडला नाही. त्यामुळे हा वाघ हा पुरकाबोडी, तिर्री अभयारण्यातच असावा, असे घटनास्थळावरील खुनावरून दिसून येते.
‘जय’चा जन्म नागझिरा अभयारण्यातील असून त्याचे माहेरघर नागझिरा असल्याने तो या मार्गाने नागझिरा अभयारण्यात तर गेला नसावा? अशी शंका बळावली आहे. तिर्री, येटेवाही जंगलात यंत्रणा संपूर्ण कामाला लागली असून व्याघ्र प्रकल्प वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.पी. चंद्रात्रे, अड्याळ वनक्षेत्राधिकारी महेश पाठक यांची चमू जंगल पिंजून काढत आहेत.
(वार्ताहर)
कऱ्हांडला अभयारण्यात मी ‘जय’ला पाहिले आहे. त्याच्या गळ्याला पट्टा असून तो चार फुट उंचीचा आहे. तो ‘जय’ असावा असे त्याच्या वर्णनावरून दिसून आले.
- मुनीश्वर काटेखाये, माजी सरपंच, चिचाळ
एका महिन्यापूर्वी ओढ्याशेजारी मोठा वाघ कधीच पाहिला नाही असा ढाण्या वाघ आढळला. तेवढा वाघ आम्ही या जंगलात पाहिला नाही.
- अशोक सलामे, गुराखी, येटेवाही