अशोक मोहरकर महाविद्यालयात ‘ओझोन दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:41 IST2021-09-17T04:41:43+5:302021-09-17T04:41:43+5:30
अड्याळ : अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय अड्याळ येथे भूगोल विभागाच्या वतीने जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला. ...

अशोक मोहरकर महाविद्यालयात ‘ओझोन दिन’
अड्याळ : अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय अड्याळ येथे भूगोल विभागाच्या वतीने जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. राजू ढबाले अध्यक्षस्थानी होते. तसेच भूगोल विभाग प्रमुख डाॅ. रमेश बावनकुळे व भूगोल विषयाचे प्राध्यापक किशोर हुकरे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. किशोर हुकरे यांनी प्रास्ताविकेतून ओझोन थराविषयी माहिती दिली. डाॅ. रमेश बावनकुळे यांनी सजीव सृष्टीच्या दृष्टीने ओझोन वायूचे महत्त्व व संरक्षणासंबंधी उपाययोजना सांगितल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डाॅ. राजू ढबाले यांनी ओझोन संरक्षणासाठी जनजागृती करणे काळाची गरज आहे, असे सांगितले. संचालन प्रा. राजकुमार देशकर व आभार प्रा. खुश्याल फुलझेले यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.