ओव्हरलोडेड ट्रक पकडले
By Admin | Updated: September 13, 2016 00:31 IST2016-09-13T00:31:14+5:302016-09-13T00:31:14+5:30
वाहतूक शाखेतर्फे आज रेतीने भरलेले तीन ओव्हरलोडेड ट्रक कारवाईदरम्यान पकडण्यात आले.

ओव्हरलोडेड ट्रक पकडले
अड्याळ : वाहतूक शाखेतर्फे आज रेतीने भरलेले तीन ओव्हरलोडेड ट्रक कारवाईदरम्यान पकडण्यात आले. या कारवाईने पुन्हा एकदा रेती तस्करीचा गोरखधंदा समोर आला आहे. सदर तिन्ही ट्रक अड्याळ पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे.
आज सोमवारी वाहतूक शाखेतर्फे केलेल्या कारवाईत रेतीचे ओव्हरलोडेड तीन ट्रक पकडण्यात आले. या ट्रकचा क्रमांक एमएच ३६ एफ २७१०, एमएच ३५ के ३८६८ व एमएच ३५ के ३८८५ असे आहेत. कारवाईनंतर तिन्ही ट्रक अड्याळ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. मागील आठवड्यात रेती वाहतुकीच्या संदर्भात मुद्दा गाजला होता. यात एका ट्रक चालकाचा मृत्यु झाल्यानंतर परिस्थिती चिघडली होती. सध्या जिल्ह्यात रेती तस्करांवर महसूल व वाहतुक विभागातर्फे करडी नजर ठेवली जात आहे. (वार्ताहर)