यशासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करा

By Admin | Updated: February 26, 2016 00:44 IST2016-02-26T00:44:25+5:302016-02-26T00:44:25+5:30

ध्येय व परिश्रम करण्याची जिद्द मनात असले तर यशाचे शिखर निश्चितच गाठता येते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी...

Overcome adverse conditions for success | यशासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करा

यशासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करा

सिनेअभिनेता राकेश राजपूत यांचे प्रतिपादन : देव्हाडी येथे आगमन, राणी अवंतीबाई प्रतिमेचे केले पूजन
तुमसर : ध्येय व परिश्रम करण्याची जिद्द मनात असले तर यशाचे शिखर निश्चितच गाठता येते. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी ती अनुकूल करण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न करावे, असे प्रतिपादन हिंदी सिनेसृष्टीतील अर्जुन पंडित, बीग ब्रदर, माँ तुझे सलाम या हीच चित्रपटातील कलावंत राकेश राजपूत यांनी केले.
बालाघाट येथे जातानी देव्हाडी येथे राणी अवंतीबाईच्या प्रतिमेचे पूजन करण्याकरिता ते थांबले होते. यावेळी स्थानिक युवकांनी त्यांचा सत्कार केला. हिंदी सिनेसृष्टीत थांबले. त्यांनी सनी देवल यांच्यासोबत अर्जून पंडित, माँ तुझे सलाम, बिग ब्रदर या चित्रपटात सहअभिनेता म्हणून अभिनय केला आहे. यासोबतच त्यांनी शरीर सौंदर्य स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेत यश प्राप्त केले आहे. राष्ट्रपती पुरस्कार त्यांनी पटकाविले होते. अभिनेते राकेश राजपूत आल्याची माहिती पंचक्रोशीत झाल्यावर शेकडो युवकांनी देव्हाडी येथे धाव घेतली. राणी अवंतीबाईच्या प्रतिमेचे पूजन केल्यावर त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. सुमारे ४५ मिनिटे ते येथे थांबले होते. राकेश राजपूत यांच्यासोबत गोंदिया जिल्हा लोधी समाज अध्यक्ष राजीव ठकरेले, संदीप नागपुरेसह स्थानिक पदाधिकारी शेखर बिरणवारे, ज्ञानेश्वर बिरणवारे, देवसिंग सव्वालाखे, श्याम नागपूरे, आलमखान, चैनलाल मसरके, जि.प. सदस्य खेमराज पंचबुद्धे, संजय बिरणवारे, शिवप्रसाद लिल्हारे, सुनिता बिरणवारे, सुधीर मसरके, अशोक बन्सोडसह ग्रामस्थ, युवक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Overcome adverse conditions for success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.