खुटसावरीत गॅस्ट्रोचा प्रकोप
By Admin | Updated: July 2, 2016 00:28 IST2016-07-02T00:28:31+5:302016-07-02T00:28:31+5:30
तालुक्यातील खुटसावरी येथील अनेकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

खुटसावरीत गॅस्ट्रोचा प्रकोप
१२ जण रुग्णालयात दाखल: आरोग्य विभागाचे पथक तैनात
भंडारा : तालुक्यातील खुटसावरी येथील अनेकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. १२ रुग्ण लाखनी येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. याविषयी आरोग्य विभागाला कळताच भंडारा व धारगाव येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट दिली असून गावातील अंगणवाडीत आरोग्य शिबिराचे पथक तैनात झाले आहेत. सध्यस्थितीत परिस्थती धोक्यात बाहेर आहे.
रुग्णांमध्ये सुनिता गजीराम गिऱ्हेपुंजे (४०), रंजना सुधाकर वघारे (३२), रुखमा गोकुळ मांढरे (६५), प्रमिला रेवाराम बडगे (३४), मोहन दयाराम गायधने (४०), विजू उत्तम मडावी (३५), सारजा कवळू बडगे (६५), अरविंद मस्के, दिनेश शेंडे, नंदा विलास भुते, योगीता किरपान, योगराज किरपान यांच्यासह जवळपास २१ जणांचा समावेश आहे.
खुटसावरी येथे गत दोन दिवसांपासून गांधी वॉर्डातील चार ते पाच जणांना शौचासह उलटी होत होती. त्यानंतर हाच प्रकार अनेकांसोबत घडला. अनेकांनी ग्रामीण रुग्णालय, धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी दवाखान्यांकडे धाव घेतली. गावात अतिसाराची लागण दिसताच याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली. त्यानंतर काल, गुरुवारी सायंकाळी भंडारा व धारगाव येथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थतीचे अवलोकन केले. रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता दिसताच अंगणावाडी केंद्रात आरोग्य शिबिर लावण्यात आले. आज सकाळपासून शिबिरात अनेक बाधीतांनी उपचार घेतला. रुग्ण शोध मोहिम राबविण्यात आली. पाण्याचे व ब्लिचिंगचे नमूने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. रुग्णसेवेसाठी धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी आर.डी. खंडाईत, डॉ. कापगते, डॉ. ठमके, नान्हे, डॉ.डी.पी. चिमणे, बी.झेड.बोंदरे, व्हि.बी. वलधरे, दिक्षा शेंडे, ए.एम. पडोळे हजेर होते. (नगर प्रतिनिधी)