पालांदूर परिसरास आजाराची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:37 IST2021-07-28T04:37:00+5:302021-07-28T04:37:00+5:30

पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात बदल आलेला आहे. या बदलाचा परिणाम आरोग्यावर दिसत आहे. डास, दूषितपाणी यांचे सुद्धा मानवी आरोग्यावर ...

Outbreak of the disease in the Palandur area | पालांदूर परिसरास आजाराची साथ

पालांदूर परिसरास आजाराची साथ

पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात बदल आलेला आहे. या बदलाचा परिणाम आरोग्यावर दिसत आहे. डास, दूषितपाणी यांचे सुद्धा मानवी आरोग्यावर परिणाम दिसत आहेत. कोरोनाचे संकट काही अंशी टळलेले असले तरी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. थोडासा सुद्धा ताप आला तरी कोरोनाची आठवण ताजी होते. शासन प्रशासनाच्या वतीने तिसऱ्या लाटेची सूचना दिलेली आहे. त्यामुळे आम जनतेन सावधगिरी बाळगणे काळाची गरज आहे. मलेरिया, विषमज्वरची रुग्णसंख्या वाढत आहे. आरोग्य विभागासह स्थानिक प्रशासनाने सुद्धा स्वच्छतेवर भर देणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी सुद्धा स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता स्वतःपासूनच पावले उचलणे गरजेचे झाले आहे.

कुटुंबात दररोज पाणी उकळून थंड करून प्यावे, शिळे उघड्यावरचे अन्न खाऊ नये, ताप अंगावर काढू नये, ताप आल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, नाहक पावसात भिजू नये, सकस आहार घ्यावा, दिवसातून वारंवार हात धुण्याची सवय लावावी, बाहेर जाणे असल्यास गर्दी टाळीत मास्कचा वापर करावा. आदी आरोग्य टिप्सची अंमलबजावणी प्रत्येकाने करावी.

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या. स्वतः कुटुंबातील व शेजारील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. विषाणूजन्य आजाराची साथ आहे. नियमित स्वच्छता व मास्क वापरा.

डॉ. आशिष गभने, वैद्यकीय अधिकारी,

ग्रामीण रुग्णालय पालांदूर

Web Title: Outbreak of the disease in the Palandur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.