मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा

By Admin | Updated: January 11, 2016 00:26 IST2016-01-11T00:26:16+5:302016-01-11T00:26:16+5:30

अड्याळ येथील एका बचत गटातर्फे येथील अंगणवाड्यांना पोषण आहाराचे बंद पॉकीट वाटप करण्यात आले.

Out-of-date nutritional supplements | मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा

मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा

अड्याळ येथील प्रकार : अधिकारी तुपाशी लेकरू उपाशी
विशाल रणदिवे अड्याळ
अड्याळ येथील एका बचत गटातर्फे येथील अंगणवाड्यांना पोषण आहाराचे बंद पॉकीट वाटप करण्यात आले. मात्र सदर आहार मुदतबाह्य असल्याचे दिसुन आल्याने खळबळ उडाली आहे. उपयोगाची अंतिम कालावधी उत्पादन केल्याच्या तारखेपासून तीन महिनेपर्यंत स्पष्ट लिहिले असल्याचा मुद्दा जागरूक पालकांनी उचलला आहे. विशेष बाब म्हणजे पॅकींग सुद्धा हाताने करण्यात आली आहे.
एकात्मिक बालविकास योजना त्यात ० ते ६ महिने, ६ ते ३ वर्षे व ३ वर्षे ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना तसेच गर्भवती व स्तनदा मातांना सुद्धा पुरक पोषण आहार, बचत गट द्वारा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत दिला जातो. त्याचे उद्दिष्ट्य एकच असते. ते म्हणजे मुलांचा पोषण आहार विषयक व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे. कुपोषण व शाळेतील गळती कमी करणे असे एक ना उद्दिष्ट्ये आहेत. ही चांगली बाब आहे.
धान्य पुरवठा करणारे बचत गट यांचा आहार खरच पोषक असतो का? जर असेल तर मागील तीन वर्षात जेव्हा जेव्हा अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मागणीनुसार त्यात ‘टीएचआर’ आहार बंद करून नवीन चांगला पौष्टीक आहार देण्याची मागणीे अंगणवाडीतर्फे नेहमी करण्यात येते.
माहितीनुसार हा पुरक पोषण आहार पुरवठा केला जातो. याचा दर्जा चेहरे पाहून, कागदोपत्री केल्या जात असल्या कारणामुळेच आंगणवाडी सेविका व मदतनिस नेहमी टीएचआर आहार बंद करावी मागणी केली आत असणार का? अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
हा पुरक पोषण आहार का वाटप करण्यात आला म्हणून येथील अंगणवाडी सेविका व मदतनिसाला मोठे आधिकारी टार्गेट करीत असले तरी जेव्हा या आहाराची प्रयोगशाळेत चाचणी झाली.
जेव्हा या धान्यांची पॅकींग करण्यात आली आणि या आहाराचा या अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात आला तेव्हा अधिकाऱ्यांनी याची शहानिशा का केली नाही? असा सवाल ग्रामस्थांनी, ग्रामपंचयातीने केल्याची माहिती आहे. ज्या बचतगटाचे लेबल पॉकीटवर आहे ते २०१४ पासून परवानगी मिळालेली आहे. मग २०१३ चा शिक्का कसा? आजपावेतो पॅकींग मशीनची असायची, याच वेळी हाताने सिलाई का करण्यात आली, हेही एक न उलगडणारे कोडे आहे.
ही माहिती जेव्हा पर्यवेक्षकांकडे यांच्यापर्यंत गेली, तेव्हा सर्व १० अंणगवाड्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा ‘प्रिंट मिस्टेक’ असल्याचे सांगण्यात आले.
दिलेले पोषण आहार घरोघरी जाऊन भितीपोटी परत मागण्याचे काम सुरु आहे. बंद पॉकीटात असणाऱ्या आहारामुळे एखाद्या बालकाला किंवा मातेच्या आरोग्याला धोका उत्पन्न झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. पवनी तालुक्यात हा आहार वाटप होत असल्याचे बचत गट अध्यक्षांनी सांगितले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याकडे विशेषत: दोषींवर जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतात त्याकडे अड्याळवासीयांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Out-of-date nutritional supplements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.