शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

२१९ पैकी ९४ शेततळे, ५ शेतबोड्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:59 IST

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत मोहाडी तालुक्यातील कृषी विभागाला २१९ शेततळ्यांचा लक्ष्यांक प्राप्त झालेला होता. या योजनेसाठी एकूण ३७० अर्ज शेतकऱ्यांनी आॅनलाईन सादर केले होते. प्राप्त लक्षांकापैकी आतापर्यंत ९४ शेततळ्यांचे काम पूर्ण होऊन त्यावर ४८.८४ लाखांचा खर्च करण्यात आला. मागेल त्याला शेतबोडी योजनेंतर्गत एकूण ...

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत मोहाडी तालुक्यातील कृषी विभागाला २१९ शेततळ्यांचा लक्ष्यांक प्राप्त झालेला होता. या योजनेसाठी एकूण ३७० अर्ज शेतकऱ्यांनी आॅनलाईन सादर केले होते. प्राप्त लक्षांकापैकी आतापर्यंत ९४ शेततळ्यांचे काम पूर्ण होऊन त्यावर ४८.८४ लाखांचा खर्च करण्यात आला. मागेल त्याला शेतबोडी योजनेंतर्गत एकूण ७ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ५ बोड्यांचे काम पूर्ण झालेले असून यावर १.४३ लाखांचा खर्च करण्यात आलेला आहे.मोहाडी तालुक्यात मागील चार वर्षांपासून एका पाण्याने खरिपाची शेती नुकसानग्रस्त होत आहे. पावसाचे ेप्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने नैसर्गीक तलाव, बोड्या जानेवारी महिन्यातच कोरड्या पडतात. उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतो. पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर असते. तेथे शेतीला सिंंचन ही बाब तर दुरापस्थच ठरते. हजारो एकर शेती मागील तीन वर्षांपासून रोवणीविना पडीत राहत आहे. खंड पडणाºया पावसामुळे रोवणीचा हंगाम लोटून जातो. दुबार पेरणी करावी लागते. त्यावर उपाय म्हणून स्वत:ची सिंचनाची सोय असावी तसेच शेतातच पाण्याचा साठा निर्माण व्हावा, भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेती व विहिरींना लाभ व्हावा, या शेतकºयांच्या मागणीला लक्षात घेत शासनाने मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला शेतबोडी योजना कार्यान्वित केली. तालुक्याला शेततळे व शेतबोडी निर्माणाचा मागणीनुसार लक्ष्यांक ठरवून देण्यात आला. शासनाचे वतीने मागेल त्याला शेततळे या योजनेचा निर्णय १७ फेब्रुवारी २०१६ रोजी निर्ममित करण्यात आला. शेतकºयांच्या मागणीनुसार शेततळ्याचे प्रकार व आकार व जागेची निवड करण्यात येते. आॅनलाईन अर्ज सादर केलेल्या शेतकºयांना सदर योजनेचा लाभ दिला जातो. शेतकºयांना दोन प्रकारच्या शेततळ्यांना लाभ दिला जातो. यात 'इनलेट आऊटलेट'सहीत शेततळे यांचा समावेश आहे.इनलेट आऊटलेटसहीत शेततळ्यांमध्ये पाणी आत भरण्याचा मार्ग व बाहेर काढण्याचा मार्ग दिला जातो. भौगोलिक पाणलोट क्षेत्रातून वाहत येणारे पावसाचे पाणी यात साठविले जाते. दुसºया प्रकारात इनलेट व आऊटलेट नसतो. शेततळ्यांत कृत्रिमरीत्या बाहेरुन पाण्याचा भरणा केला जातो.मोहाडी तालुक्यात कृषी विभागाने लोकांची मागणी व गरज लक्षात घेत शेततळे व शेतबोड्यांचे नियोजन करुन कामाला सुरवात केली. निर्धारित २१९ शेततळ्यांच्या लक्षांकापैकी ९४ शेततळे पुर्ण केले. शेतबोड्यांच्या ७ लक्षांकापैकी ५ शेतबोड्या पूर्ण करण्यात आल्या. बांधकामाच्या आकारमानानुसार शेततळ्यांना जास्तीत जास्त ५० हजार तर शेतबोड्यांच्या ७ लक्षांकापैकी ५ शेतबोड्या पूर्ण करण्यात आल्या. बांधकामाच्या आकारमानानुसार शेततळ्याना जास्तीत ५० हजार त शेतबोड्यांना ४२ हजारापर्यंत अनुदान शासनाचे वतीने देय असून यावरील अधिकचा खर्च शेतकºयांना स्वत: करावयाचा आहे. ९४ शेततळ्यांचे कामावर आतापर्यंत ४८.८४ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. तर मागेल त्याला शेतबोळी योजनेंतर्गत ५ बोळ्यांवर १.४३ लाखांचा खर्च करण्यात आलेला आहे.शेततळ्यांची ५० टक्के कामे अपूर्णमोहाडी कृषी विभागाला प्राप्त लक्षांकापैकी आतापर्यंत २१९ पैकी ९४ शेततळ्यांचे काम पुर्ण करण्यात विभागाला यश आले. उर्वरित कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी होतात, यावर कृषी विभागाची कामगिरी अवलंबून राहणार आहे. लक्षांकपूर्तीसाठी कृषी विभागाच्या जनजागृतीची व मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.मागेल त्याला शेततळे व शेतबोडी योजना शेतकºयांच्या फायद्याची आहे. एका पाण्याचा दुष्काळ संपविण्याची क्षमता यात आहे. शेतकºयांनी या योजनेतील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. मागील वेळी ज्या शेतकºयांनी या योजनांचा लाभ घेतला त्यांना पाऊस खंडित झालेल्या काळात रोवणीची कामे वेळेवर करता आली.-राहुल गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी, मोहाडी