बहुजन विरोधी सरकारला हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:00 AM2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:01:08+5:30

साकोली मतदारसंघात नाना पटोले यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यात नाना पटोले यांनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधला. लाखनी तालुक्यातील मुरमाडी तुप, रेंगेपार, चिचटोला, धाबेटेकडी, शिवणी, मोगरा, नान्होरी येथे शनिवारी सभा घेण्यात आल्या.

Oust the anti-Bahujan government | बहुजन विरोधी सरकारला हद्दपार करा

बहुजन विरोधी सरकारला हद्दपार करा

Next
ठळक मुद्देरमेश डोंगरे : नाना पटोले यांच्या प्रचारार्थ गावागावात सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विद्यमान सरकार बहुजनांचा आवाज दडपत असून अशा बहुजनविरोधी सरकारला हद्दपार करण्यासाठी साकोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांना निवडून आणा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले.
साकोली मतदारसंघात नाना पटोले यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यात नाना पटोले यांनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधला. लाखनी तालुक्यातील मुरमाडी तुप, रेंगेपार, चिचटोला, धाबेटेकडी, शिवणी, मोगरा, नान्होरी येथे शनिवारी सभा घेण्यात आल्या. रमेश डोंगरे म्हणाले, साकोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, पिरीपा अशा संयुक्त आघाडीच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना जागृत होऊन एक होण्याची वेळ आली आहे. स्थानिक नेत्यांचा आधार घेत बाहेरची शक्ती या मतदारसंघात एकाधिकार गाजविण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नाना पटोले हे तळागाळातील जनतेशी जुळलेले व्यक्तीमत्व आहे. प्रत्येक जातीधर्मामध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना निवडून आणण्याचे काम प्रत्येकाचे आहे. ही संधी गमावल्यास आपले फार मोठे नुकसान होईल असे रमेश डोंगरे म्हणाले. त्यांच्या प्रचारसभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Oust the anti-Bahujan government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.