शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

आमच्या मातीतील चित्रपट हा आमचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 21:57 IST

आमच्या मातीत तयार झालेला हा चित्रपट आमच्या सर्वासाठी अभिमानाचा क्षण आहे. मुंबई किंवा अन्य ठिकाणी बरीच साधने उपलब्ध असतात, मात्र भंडारा जिल्ह्यातील युवकांनी अल्प साधन सामुग्रीसह खुप सुंदर प्रयत्न देशभरातील चित्रपट क्षेत्रातील विविध भागातील लोकांना एकत्र करत केलेला आहे आणि 'हौसला और रास्ते' हा लघुपट साकारला, असे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अ‍ॅकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी केले.

ठळक मुद्देवर्षा पटेल : भंडारा येथे ‘हौसला और रास्ते’ लघुचित्रपटाचे प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आमच्या मातीत तयार झालेला हा चित्रपट आमच्या सर्वासाठी अभिमानाचा क्षण आहे. मुंबई किंवा अन्य ठिकाणी बरीच साधने उपलब्ध असतात, मात्र भंडारा जिल्ह्यातील युवकांनी अल्प साधन सामुग्रीसह खुप सुंदर प्रयत्न देशभरातील चित्रपट क्षेत्रातील विविध भागातील लोकांना एकत्र करत केलेला आहे आणि 'हौसला और रास्ते' हा लघुपट साकारला, असे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अ‍ॅकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी केले.साखरकर सभागृह, भंडारा याठिकाणी सदर चित्रपट गुरुवारला प्रदर्शित झाला. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, रामलाल चौधरी, मुकुंद साखरकर तसेच मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते. या चित्रपटाचे निर्माता चेतन भैरम व दिग्दर्शक रोशन भोंडेकर व्यासपीठावर उपस्थित होते.भंडारा जिल्ह्यातील युवकांनी केलेला प्रयत्न यशस्वी झाला असा भाव सर्वांच्या ठायी यावेळी दिसून आला. चित्रपटातील सर्व कलाकारांचा सत्कार देखील याप्रसंगी आयोजित केला होता. चित्रपटातील सर्व कलाकार याप्रसंगी उपस्थित होते.यापूर्वी हा लघुचित्रपट फ्रांस येथील मेडिटेरियन कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आणि सातव्या दिल्ली आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात दाखवला गेला. या दोन्ही महोत्सवात 'हौसला और रास्ते' या चित्रपटाला 'बेस्ट फर्स्टटाइम फिल्ममेकर्स' आणि 'स्पेशल फेस्टिवल मेंशन' म्हणून गौरव करण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या परिवाराच्या समस्या या ज्वलंत विषयावर हा लघुचित्रपट तयार केलेला आहे. या लघुपटाची सिनेमॅटोग्राफी तथा संगीत दिग्दर्शन प्रशांत चव्हाण (मुंबई) यांनी केले आहे.अक्षित रोहडा (गुजरात) यांनी सहाय्यक सिनेमेटोग्राफर म्हणून काम केले आहे. प्रशांत वाघाये सहनिमार्ता आहेत, तर योगेश भोंडेकर कार्यकारी निमार्ता आहेत आणि इंस्ट्रक्टर इमरान शेख आहेत. गुजरातचे अभिनेते मौलिक चव्हाण, हिमांशी कावळे प्रमुख भुमीकेत आहेत. तसेच संजय वनवे, अतुल भांडारकर, अंजली भांडारकर, सुरेश जोशी, सरोजलता बर्वे, स्वप्नील जांगळे, नीलेश हंबरडे यांच्या भूमिका देखील या चित्रपटात आहेत.