१० जूनला ‘राशी-कवच’ चे आयोजन
By Admin | Updated: June 8, 2016 00:37 IST2016-06-08T00:37:24+5:302016-06-08T00:37:24+5:30
कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तीमत्व व त्यांच्या राशींमधील गमतीजमती यावर ...

१० जूनला ‘राशी-कवच’ चे आयोजन
कौटुंबिक कार्यक्रम : व्यक्तीमत्व व राशींमधील गमतीजमतीचे सादरीकरण
भंडारा : कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तीमत्व व त्यांच्या राशींमधील गमतीजमती यावर आधारीत ज्योतिषाचार्य अरविंद पांडे यांच्या ‘राशी कवच’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगलमुर्ती सभागृह खात रोड, भंडारा येथे दि. १० जून २०१६ रोजी सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
भुतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याभोवती आपले आयुष्य फिरत असते. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने तीनही काळांचा विचार करून प्रत्येक पाऊल टाकत असतो. काल केलेल्या चुका आज करायच्या नाही आणि पुढे पण करायच्या नाही असे ठरविणारा प्रत्येक व्यक्ती तीनही काळाचा विचार करीत असतो.
पण हा विचार करीत असताना नेमका राशींचा प्रभाव त्याच्या जीवनावर कसा आणि केव्हा होतो, मनुष्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी, त्याचा व्यवसाय, प्रगती, नोकरी, यश या सर्व गोष्टींवर त्याच्या कर्तृत्वाबरोबर त्याच्या नशिबाचा आणि राशींचा प्रभाव पडतो. हेच नेमके या कार्यक्रमातून सांगण्यात येणार आहे. कार्यक्रमाकरिता डी. एम. फॅमिली होटलचे संचालक भरत मल्होत्रा व सौंदर्यतज्ञ नंदिनी ब्राम्हणकर यांचे सहकार्य लाभणार आहे. सखी मंच सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. (मंच प्रतिनिधी)