लाखनीत अ‍ॅग्रो टेक २०१७ चे आयोजन

By Admin | Updated: December 26, 2016 01:02 IST2016-12-26T01:02:44+5:302016-12-26T01:02:44+5:30

विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड निर्माण व्हावी

Organizing Lakhaneet Agro Tech 2017 | लाखनीत अ‍ॅग्रो टेक २०१७ चे आयोजन

लाखनीत अ‍ॅग्रो टेक २०१७ चे आयोजन

शेतकऱ्यांना मार्गदर्शन : मेळाव्याचा लाभ
लाखनी : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड निर्माण व्हावी व त्यामधूनच शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावेल या दृष्टीकोणातून भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे अ‍ॅग्रो टेक - २०१७ चे आयोजन ११ ते १४ फेब्रुवारी २०१७ ला आयोजित करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड निर्माण करणे हे उद्दिष्ट्ये समोर ठेवूनच अ‍ॅग्रोटेक २०१७ चे आयोजन करण्यात येणार आहे. अ‍ॅग्रोटेक कृषी प्रदर्शनीमध्ये धान, ऊस, कापूस, संत्रा, विविध फळे, भाजीपाला, कडधान्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विषयक नवीन तंत्रज्ञानाविषयी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अ‍ॅग्रो टेक २०१७ मध्ये शेतकऱ्यांसाठी विविध विषयावर मोफत कार्यशाळा, भव्य शेतकरी मेळावा, शेतकऱ्यांना शेतीला पुरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी योग्य मार्गदर्शन, एकदिवसीय डेअरी व्यवस्थापन व धानपरिषदेचे आयोजन, शेतकऱ्यांना विविध विषयावर तज्ज्ञाद्वारे योग्य मार्गदर्शन, ठिंबक सिंचन बद्दल मार्गदर्शन मच्छीपालन शेळीपालन विषयी तज्ज्ञांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. अ‍ॅग्रो टेक - २०१७ मध्ये नामांकीत कंपन्यांचे स्टॉल शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहणार आहेत.
तसेच नामांकीत कंपन्यांचे कृषी विषयक तज्ज्ञ मार्गदर्शक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणार आहेत. अ‍ॅग्रो टेक - २०१७, ११ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०१६ पर्यंत आयोजित कृषी प्रदर्शनीमध्ये शेतकरी मेळावा, एक दिवसीय डेअरी व्यवस्थापन व धान परिषदेमध्ये प्रयोजक, सहभागी, डेलीगेट्स म्हणून किंवा स्टॉल बुकींग करता येणार आहे.
त्याचप्रमाणे अ‍ॅग्रो टेक २०१७ कृषी प्रदर्शनी शेतकरी मेळावा, शेतकऱ्यांसाठी विविध विषयावर मोफत कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घेऊन आपल्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या असे आवाहन करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Organizing Lakhaneet Agro Tech 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.