मचारणा येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:06 IST2021-02-06T05:06:11+5:302021-02-06T05:06:11+5:30

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सरपंच संगीता घोनमोडे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा महामंत्री मंगेश मेश्राम उपस्थित होते. अतिथी ...

Organizing Kabaddi competition at Macharana | मचारणा येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन

मचारणा येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सरपंच संगीता घोनमोडे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा महामंत्री मंगेश मेश्राम उपस्थित होते. अतिथी म्हणून घनश्याम मते, संजय फटे, मांगलीचे सरपंच प्रशांत मासुरकर उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम क्रमांक वैनगंगा स्पोर्टिंग क्लब ब्राम्हणी यांना देण्यात आला. द्वितीय बक्षीस समस्त ग्रामवासी क्रीडा मंडळ कान्हाळगाव, तृतीय बक्षीस स्व. यादोराव पडोळे क्रीडा मंडळ,चितापूर ,चतुर्थ बक्षीस माहुली क्रीडा मंडळ पेंढरी यांना देण्यात आला. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदा मेश्राम उपस्थित होत्या. अतिथी म्हणून मंगेश मेश्राम ,संगीता घोनमोडे ,घनश्याम मते , प्रशांत मासुरकर, भेनाथ झलके, सोमेश्वर कातोरे, पोलीस पाटील लाला कातोरे गणेश पगाडे, नरेश घोनमोडे, राहुल ठवकर, धीरज घोनमोडे, आश्लेश भोयर, वैभव बान्ते, निखिल कडव ,सुरज कडव आदी उपस्थित होते.

Web Title: Organizing Kabaddi competition at Macharana