महिलांचे संघटन, संरक्षण चर्चासत्र

By Admin | Updated: October 14, 2014 23:14 IST2014-10-14T23:14:57+5:302014-10-14T23:14:57+5:30

करडी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात लोकसंख्या शिक्षण मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने युवा रूरल नागपूर तसेच युवा अनुभव शिक्षा केंद्र भंडारा

Organization of women, conservation seminars | महिलांचे संघटन, संरक्षण चर्चासत्र

महिलांचे संघटन, संरक्षण चर्चासत्र

करडी (पालोरा) : करडी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात लोकसंख्या शिक्षण मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने युवा रूरल नागपूर तसेच युवा अनुभव शिक्षा केंद्र भंडारा यांचे वतीने महिला संघटन, संरक्षण विषयावर चर्चासत्र घडवून आणले गेले. महिलांचे समुपदेशन कार्यक्रमावर भर देण्यात आला.
चर्चासत्राचे अध्यक्षस्थानी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय करडीच्या प्राचार्या डॉ. स्मिता अंबादे तर प्रमुख वक्त्यांच्या स्थानी मृणाल मुनीश्वर होत्या. विद्यार्थ्यांना महिलांचे संरक्षण, संगठन या विषयावर अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानही आत्मसात करावे, विद्यार्थ्यांनी स्वत:चे संरक्षण करण्यास स्वत:च समर्थ व्हावे, असे वक्तव्य मृणाल मुनीश्वर यांनी व्यक्त केले.
समाजामध्ये वागतांना विद्यार्थ्यांचे वर्तण आणि वागणूक तसेच मनोवृत्ती चांगली असली पाहिजे, त्यांच्या दृष्टीकोन नेहमी सकारात्मक असला पाहिजे. अभ्यासाप्रती नेहमी जिज्ञासा वृत्ती बाळगून स्पर्धात्मकरित्या सामोरे जाण्यासाठी धडपडले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्या स्मिता अंबादे यांनी व्यक्त केले. संचालन प्राध्यापिका सार्वे यांनी तर आभार प्राध्यापिका चामट यांनी मानले. आयोजनासाठी प्राध्यापक वंजारी, वाडीभस्मे, धार्मिक, कटनकर, पाटील, सोनवाने, शेंडे, हुमणे, सारकर, सोनुले, डोहळे, ढवळे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
बाबा जुमदेवजी यांची पुण्यतिथी
जांब (लोहारा) : परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ लोहाऱ्याच्या वतीने मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची पुण्यतिथी व कोजागिरी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नत्थू बांडेबुचे, प्रमुख पाहुणे मार्गदर्शकिा बाया कार, झाडू वनवे, महादेव देवगडे, यादोराव लेदे, गुलाब किटे, युवराज लेदे, दलपत गोडबोले हे होते तर सेवक भोयर, रमेश लेदे, नितीन बांडेबुचे, भोजराम देवगडे, किसन डोणारकर, सुर्यभान माकडे, विलास गोडबोले तसेच परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ लोहारा येथील सर्व सेवक सेविका व बालगोपाल प्रामुख्याने उपस्थित होते. त्यानंतर बैठक घेण्यात आली. कार्यक्रमाचे आभार रमेश लेदे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Organization of women, conservation seminars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.