कर्मचाऱ्यांच्या समस्यांना घेऊन संघटना पोहोचली मंत्रालयात
By Admin | Updated: October 25, 2016 00:26 IST2016-10-25T00:26:21+5:302016-10-25T00:26:21+5:30
जिल्ह्यात कार्यरत विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या मागील अनेक दिवसांपासून शासनदरबारी प्रलंबित आहेत.

कर्मचाऱ्यांच्या समस्यांना घेऊन संघटना पोहोचली मंत्रालयात
कास्ट्राईब महासंघ : विविध समस्यांबाबत निवेदन सादर
भंडारा : जिल्ह्यात कार्यरत विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या मागील अनेक दिवसांपासून शासनदरबारी प्रलंबित आहेत. त्यावर तोडगा निघावा यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात जाऊन निवेदन दिले.
कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबद संघटनेने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त यांना वारंवार निवेदन देऊनही कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली निघाल्या नाहीत. त्यामुळे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात धाव घेऊन समस्यांचे निवेदन दिले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर स्थानांतरणाने भंडाऱ्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलण्यात आली असून पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. जि.प. मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे, प्राथमिक आरोग्य केंद्र सानगडी, गोंडउमरी येथील कंत्राटी आरोग्य सेविका यांना ५ टक्के मानधन वाढीचा लाभ देण्यात यावा, भूविकास बँकेचे ३६ महिन्यांचे थकीत पगार देण्यात यावे, बिंदू नामावली संबंधाने चर्चा करण्यात आली. वसतिगृहातील कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, नक्षलग्रस्त तालुक्यातील कंत्राटी ए.एन.एम., एल.एच.व्ही., एस.एन. यांना २००७ पासून नक्षलग्रस्त वेतनाची थकबाकी देण्यात यावी, प्रसुती रजेचा पगार तात्काळ देण्यात यावा आदी विषयांच्या समस्या निवेदनातून देण्यात आल्या. शिष्टमंडळात महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, प्रभू ठवकर, वामन धकाते, सिंधू राऊत, ए.बी. गजभिये, प्रा.मधुकर ऋश्वेश्वरी, प्रा.विनोद मेश्राम आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)