बैलजोडी खरेदीतील गैरव्यवहार चौकशीचे आदेश
By Admin | Updated: March 8, 2016 00:25 IST2016-03-08T00:25:23+5:302016-03-08T00:25:23+5:30
तालुक्यातील विविध योजनांच्या अंमजबजावणीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक संताजी मंगल कार्यालयात आमदार बाळा काशिवार यांनी विविध शासकीय विभागाची माहिती घेतली.

बैलजोडी खरेदीतील गैरव्यवहार चौकशीचे आदेश
बाळा काशीवार यांचे निर्देश : लाखनी येथे आढावा सभा
लाखनी : तालुक्यातील विविध योजनांच्या अंमजबजावणीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक संताजी मंगल कार्यालयात आमदार बाळा काशिवार यांनी विविध शासकीय विभागाची माहिती घेतली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद भाग्यश्री गिलोरकर, गटविकास अधिकारी मिलिंद बडगे, नायब तहसीलदार अश्विनी जाधव, पंचायत समितीचे सभापती रजनी आत्राम, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, उपसभापती विजय कापसे, वर्षा रामटेके, वंदना पंधरे, पद्माकर बावनकर, रजनी पडोळे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार बाळा काशीवार यांनी प्रारंभी सरपंच व ग्रामसेवकांची अल्प उपस्थिती पाहून नाराजी व्यक्त केली जे ग्रामसेवक उपस्थित नाही त्यांना नोटीस देण्याचे आदेश पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले. इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजनेचा निधी वापस जाऊ नये यासाठी तात्काळ नियोजन करुन जनतेची कामे पहिल्यांदा करण्याचे निर्देश देण्यात आले. उन्हाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने पाणी टंचाई गावाकडे लक्ष देण्याचे सांगितले. जमिनीत ३० टक्के वरुन ७० टक्के पानी कसे जिरवता येईल याचे नियोजन करण्याचे आदेश दिले. गावात नळाचे पाणी वाया जाणार नाही यासाठी ग्रामपंचायतने लक्ष देणे गरजेचे असले पाहिजे असे आमदार काशिवार यांनी स्पष्ट केले.
पशुविभागातर्फे होणाऱ्या गैरव्यवहाराची चौकशी लवकरात लवकर करावी व ज्यांनी बैलजोडीसाठी अनुदान प्राप्त झाले व त्यांनी अनुदानाकरिता चुकीची माहिती पुरविली त्यांच्यावर कारवाई करण्याची सुचना केली. शालेय पोषण आहाराकडे विशेष लक्ष देण्यासाठी शिक्षण विभागाला सांगण्यात आले. शाळेत येणारा तांदाळाचा बोरा हा ५० किलोचा न राहता तो ४६-४७ किलोचा असतो. त्यासाठी तपासणी करुन मालाची उचल करण्याची सुचना दिली. संचालन दुनेदार यानी केले.
(तालुका प्रतिनिधी)