तत्कालीन अध्यक्षांना १९ लाख रुपये जमा करण्याचे आदेश
By Admin | Updated: December 12, 2015 00:45 IST2015-12-12T00:45:01+5:302015-12-12T00:45:01+5:30
सहकारी शेतकी खरेदी विक्री विक्री समिती अंतर्गत सन २००० ते २००६ या कालावधीत गैरव्यवहार प्रकरणी शासनाच्या सहकारी विभागामार्फत चौकशी करण्यात आली.

तत्कालीन अध्यक्षांना १९ लाख रुपये जमा करण्याचे आदेश
न्यायालयाचा आदेश : गैरव्यवहारप्रकरणी सहकार विभागाची चौकशी
तुमसर : सहकारी शेतकी खरेदी विक्री विक्री समिती अंतर्गत सन २००० ते २००६ या कालावधीत गैरव्यवहार प्रकरणी शासनाच्या सहकारी विभागामार्फत चौकशी करण्यात आली. यात तत्कालीन अध्यक्षांना १९ लक्ष रुपये जमा करण्याचा हमदस काढला आहे. .
तुमसर सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीवर सन २००० ते २००६ या कालावधीत रविदयाल पटले अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात रासायनिक खत केंद्र गावोगावी सुरु करण्यात आले होते. येथे खताच्या केंद्रावर जाऊन रकमा वसुल करण्यात आल्या, परंतु संस्थेत जमा न करता केंद्राच्या नावाने रेकार्डला शिल्लक दाखविले. सन २००१- २००२ मध्ये गावागावात धान खरेदी केंद्र सुरु केली होती. यात ४५६० क्विंटल घट दाखविले. या घटीचा संस्थेवर १९ लाखांचा भूर्दंड बसला. त्या अनुषंगाने शासनाच्या सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक, तुमसर यांनी कलम ८३ अन्वये चौकशी करुन चौकशी अहवालसादर केला. सहाय्यक निबंधक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम नुसार चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला. त्या अनुषंगाने संस्थेला कारवाई करण्याचे आदेश २५ जानेवारी २००८ ला दिले, परंतु समितीने कोणतीच कारवाई केली नाही. कलम ८८ चे कारवाई संबंधाने तत्कालीन अध्यक्ष रविदयाल पटले यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नगापूर येथे २ एप्रिल २००८ ला सदर प्रकरण दाखल केले. सदर प्रकरण खारीज करुन कलम ८८ अन्वयेचे आदेश कायम ठेवले. (तालुका प्रतिनिधी)