काँग्रेसचे महामार्गावर निदर्शने

By Admin | Updated: August 25, 2015 00:45 IST2015-08-25T00:45:32+5:302015-08-25T00:45:32+5:30

केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या नेतृत्वात...

Opposition on Congress highway | काँग्रेसचे महामार्गावर निदर्शने

काँग्रेसचे महामार्गावर निदर्शने

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : केंद्र व राज्य शासनाविरुद्ध पर्दाफाश आंदोलन
भंडारा : केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या नेतृत्वात त्रिमूर्ती चौकात पर्दाफाश आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करुन सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
आंदोलनादरम्यान केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ललीत मोदीला मदत केल्याप्रकरणी निषेध करण्यात आला. स्वराज यांनी राजीनामा द्यावा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या कार्यकाळात झालेल्या व्यापमं घोटाळा प्रकरणी त्यांनी राजीनामा द्यावा, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधीया यांनी राजीनामा द्यावा, राज्य सरकारने सावकारी कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु कर्जमुक्ती मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, गतवर्षीच्या अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अजूनपर्यंत न मिळालेली मदत मिळाली पाहिजे, एपीएल व बीपीएलधारकांना पूर्ववत अन्नधान्य मिळाले पाहिजे. एफआरपीबाबत निर्णय घेण्याबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली पाहिजे, दुधाच्या दराबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, केंद्र व राज्याच्या सत्ताधारी मंत्र्यांचा भ्रष्टाचार, बोगस पदव्या आणि दडवलेल्या मालमत्तेसंदर्भात चौकशी झाली पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे, बेरोजगारांना व युवकांना रोजगार मिळाले पाहिजे अशा घोषणा दिल्या.
त्यानंतर शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनिल पडोळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हाध्यक्ष जिया पटेल, प्रेमसागर गणवीर, प्रमिला कुटे, सीमा भुरे, सभापती विनायक बुरडे, सभापती नीळकंठ टेकाम, मधुकर लिचडे, अरविंद कारेमोरे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, आकाश कोरे, अशोक कापगते, रेखा वासनिक, चुन्नीलाल वासनिक, नीळकंठ कायते, प्रेमकुमार वनवे, ज्ञानेश्वर राहांगडाले, प्रदिप बुराडे, मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, रमेश डोंगरे, वंदना पंधरे, मंदा गणवीर, शुद्धमता नंदागवळी, के.के. पंचबुद्धे, प्रसन्ना चकोले, भुषण टेंभुर्णे, अनिक जमा, अभिजीत वंजारी, नितीन बागडे, गणेश लिमजे, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, मार्तंड भेंडारकर, प्रभू मोहतुरे, सुरेंद्र पाटील, मोहन पंचभाई, भुमेश्वर महावाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Opposition on Congress highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.