शवविच्छेदनगृहाच्या बांधकामाला विरोध

By Admin | Updated: May 9, 2014 23:57 IST2014-05-09T23:57:19+5:302014-05-09T23:57:19+5:30

सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील नविन शवविच्छेदन गृह बांधकाम त्वरित बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा ....

Opposite to the construction of post-mortem | शवविच्छेदनगृहाच्या बांधकामाला विरोध

शवविच्छेदनगृहाच्या बांधकामाला विरोध

तुमसर : सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील नविन शवविच्छेदन गृह बांधकाम त्वरित बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरीकांसह पंचायत समिती सभापती उपेश बांते यांनी दिला आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, तुमसर येथील शासकिय उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालयाला लागून असलेल्या घरांजवळ नविन शवविच्छेदन गृहाचे बांधकाम करण्यात येत आहे. परिसरातील नर्मदा बांगळकर, गुरुनानक नगर यांचे स्वयंपाकगृह व रुग्णालयातील विन शवविच्छेदन गृहाचे अंतर केवळ दहा फुट आहे. या शवविच्छेदनगृहामुळे नर्मदा बांगडकर यांचे कुटूंबातील लहान मुले भयभीत झाले आहेत. यापूर्वी प्रभागातील नागरिकांनी दहा वर्षापुर्वी नविन शवविच्छेदन गृहाच्या बांधकामाला विरोध केला होता. तशी लेखी तक्रार संबंधित विभागाला केली होती. त्यामुळे बांधकामाला सुरुवात झाली नव्हती. पंरतु पुन्हा नविन शवविच्छेदन गृह बांधकाम सुरु करण्यात आले आहे. जुने शवविच्छेदन गृह आहे तिथेच ते सुरु ठेवुन त्यांचे आधुनिकीकरण करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. नविन शवविच्छेदन गृहाचे बांधकाम त्वरित बंद न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समिती उपसभापती उपेश बांते यांनी निवेदनातून दिला आहे. यासंदर्भात वरीष्ठांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आले आहे. निवेदनावर उपेश बांते यांच्यासह अनेक नागरीकांच्या स्वाक्षर्‍या आहेत. जुने शवविच्छेदन गृह आहे तिथेच ते सुरु ठेवुन त्यांचे आधुनिकीकरण करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा नागरीकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Opposite to the construction of post-mortem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.