गृहअर्थशास्त्रातून स्वयंरोजगाराची संधी
By Admin | Updated: February 8, 2016 00:47 IST2016-02-08T00:47:05+5:302016-02-08T00:47:05+5:30
बाह्य जीवनात मार्केटिंग करताना एक रुपयापासून एक करोड रुपये जमा करता येतात. त्यातुन मोठा उद्योगपती बनता येते.

गृहअर्थशास्त्रातून स्वयंरोजगाराची संधी
मार्गदर्शन कार्यक्रम : कोटांगले यांचे प्रतिपादन
जवाहरनगर : बाह्य जीवनात मार्केटिंग करताना एक रुपयापासून एक करोड रुपये जमा करता येतात. त्यातुन मोठा उद्योगपती बनता येते. याकरिता स्त्रियांनी गृहअर्थशास्त्र समजून घेणे काळाची गरज आहे. यामुळे कुटुंबाचा आर्थिक विकास होतो. परिणामी गृहअर्थशास्त्रामधून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतात, असे प्रतिपादन प्रा. जगजीवन कोटांगले यांनी केले.
कला-वाणिज्य पदवी महाविद्यालय येथे गृहअर्थशास्त्र विभागाद्वारे आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात प्रा. जगजीवन कोटांगले बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य अजयकुमार मोहबंशी होते. यावेळी टेक्निकल इन्स्टिट्यूटचे प्राचार्य वर्षा गौपाले, राजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र पटले, गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. साधना वाघाडे उपस्थित होते. प्रमुख वक्ते वर्षा गौपाले म्हणाल्या की, गृहिणींना स्वत:च्या पायावर उभे राहणे आजच्या काळाची गरज आहे.
कोणतेही कार्य करण्याची जिद्द व चिकाटी असणे आवश्यक आहे. डॉ. राजेंद्र पटले म्हणाले गृहअर्थशास्त्र विषयाच्या ज्ञानातून एक चांगले वस्त्रशास्त्रज्ञ, डिझाईनर म्हणून स्वयंरोजगारातून विविध साहित्य निर्माण करता येतात.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अजयकुमार मोहबंशी म्हणाले की, पाळण्यासारखीच स्त्रियांच्या हाती उद्योगाची दोरी दिली तर ती उद्योग विश्वाचाही उध्दार करु शकतेत्र उद्योगासाठी आवश्यक असलेले गुण ध्येय निश्चिती, उपक्रमशीलता, साहम्, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, संघर्षाची तयारी, जबाबदारी, संघटन कौशल्य, प्रामाणिकता गुण निसर्गाने स्त्रीला दिली.
प्रास्ताविक प्रा. डॉ. साधना वाघाडे यांनी केले. संचालन पल्लवी सहारे यांनी केले. आभार भारती ठाकरे यांनी मानले. (वार्ताहर)