खरेदी केंद्रात धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:50 IST2018-10-30T22:50:29+5:302018-10-30T22:50:48+5:30

शेतकऱ्यांची विश्वासाची धान खरेदी केंद्र म्हणजे शासकीय आधारभूत खरेदी केंद्र. मात्र ज्या विश्वासाने शेतकरी या केंद्रावर धान विक्रीकरिता येतात. त्या केंद्रावर रात्रपाळीला चौकीदारच नाही त्यामुळे धान रात्री उघड्यावरच असल्याने ते चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Opening of the paddy in the shopping center | खरेदी केंद्रात धान उघड्यावर

खरेदी केंद्रात धान उघड्यावर

ठळक मुद्देसुरक्षाभिंतही नाही : चौकीदाराअभावी साहित्य चोरीची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : शेतकऱ्यांची विश्वासाची धान खरेदी केंद्र म्हणजे शासकीय आधारभूत खरेदी केंद्र. मात्र ज्या विश्वासाने शेतकरी या केंद्रावर धान विक्रीकरिता येतात. त्या केंद्रावर रात्रपाळीला चौकीदारच नाही त्यामुळे धान रात्री उघड्यावरच असल्याने ते चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीची भिती कायम असते.
शेतकºयांच्या जिव्हाळ्याचे खरेदी केंद्र म्हणून आधारभूत धान खरेदी केंद्र या केंद्रावर शासनाच्या ठरलेल्या दरानुसार धानाचे एकमुस्त पैसे बँक खात्यावर जमा होतात. या विश्वासावरच शेतकरी या केंद्रावर धान विक्रीकरिता नेतात. यावर्षीच्या नविन नियमानुसार प्रत्येक शेतकºयाला धान विक्रीला आणल्या नंतर आधी सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स आणून आधी आॅनलाईन अर्ज करावा लागतो.
या अर्जानतर जो नंबर मिळाला असेल त्या नंबरनुसार धानाचे वजन केले जाते. यासाठी कधीकधी एक दोन दिवसाचा वेळ लागतोच. तोपर्यंत शेतकºयांना धान उघड्यावरच स्वत:च्या भरोशावर धान तसाच ठेवावा लागतो.
दिवसा या खरेदी केंद्रावर लोकाची ये-जा राहते मात्र रात्री हे खरेदी केंद्र सुनसान होतात. रात्री येथे चौकीदारही नसतो. त्यामुळे धान चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी श्रीराम सहकारी भात गिरणी येथील आधारभूत धान खरेदी केंद्रातून रात्री सदु कापगते याचे आठ ते दहा धानाचे बोरे चोरीला गेले होते. याची पोलिसात तक्रारही झाली होती. मात्र तरीही रता्रीचा चौकीदार अजुनपर्यंत ठेवण्यात आला नाही. जर रात्री अचानक पाऊस आला तर धान ओले होऊ शकतात.
यासाठी शेडचीही व्यवस्था नाही. तर या खरेदी केंद्रावर दिवसभर शेतकरी व इतराची ये-जा सुरु असते. धान वजन करणे, हुंडी तयार करणे हे काम दिवसातच सुरु असते. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोाातून सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाचे आहे. मात्र अनेक केंद्रावर तेही लावण्यात आलेले नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या सुधारणा कराव्यात अशी शेतकºयांची मागणी आहे.

Web Title: Opening of the paddy in the shopping center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.