साकोलीत रेती, गिट्टी, मुरुमाचे खुलेआम खनन

By Admin | Updated: April 22, 2017 00:43 IST2017-04-22T00:43:36+5:302017-04-22T00:43:36+5:30

तालुक्यात रेती, मुरुम व गिट्टीचे खुलेआम खनन सुरु असून शासनाला दररोज लाखों रूपयाचा तोटा सहन करावा लागत आहे.

Opening mining of Sakoliit sand, ballast, muruman | साकोलीत रेती, गिट्टी, मुरुमाचे खुलेआम खनन

साकोलीत रेती, गिट्टी, मुरुमाचे खुलेआम खनन

महसूल विभागाचे दुर्लक्ष : रेती तस्करीसाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी
संजय साठवणे  साकोली
तालुक्यात रेती, मुरुम व गिट्टीचे खुलेआम खनन सुरु असून शासनाला दररोज लाखों रूपयाचा तोटा सहन करावा लागत आहे. साकोलीचे तहसील प्रशासन या अवैध उत्खननाला रोखण्यासाठी सपेशल अयशस्वती ठरले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी साकोली तालुक्यासाठी वेगळी ‘टिम’ तयार करून या अवैध उत्खननावर आळा बसवावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
साकोली तालुक्यात चुलबंद नदीचे पात्र असून या नदीपात्रातून दररोज हजारो "ट्रीप" रेतीचे खुलेआम अवैध उत्खनन होत आहे. तालुक्याताील केवळ तीन रेतीघाटाचे लिलाव वगळता उर्वरीत रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. या रेतीघाटावरुन रात्री व दिवसा खुलेआम रेतीतस्करी राजरोसपणे सुरु आहे. महालगांव, लवारी, उमरी, धर्मापुरी, मोहघाटा, या रेतीघाटावरुन राजरोसपणे रेतीचे अवैध उत्खनन सुरु आहे. रेतीतस्करी प्रमाणेच गिट्टी व मुरुमाचे अवैधरित्या खनन सुरु आहे. एकाच रॉयल्टीवर वेळ बदलवून तीन ते चार "ट्रीपा" केल्या जातात. तर या वैध उत्खननाचा महसूल विभागाची मूकसमंती असल्याचे दिसून येत आहे.

रेती चोरीच्या दंडाला मुरूम चोरीचे दंड
सध्या रेती तस्करांचे व तलाठ्याचे चांगलेच एकमत आहे. रेतीचे ट्रक पकडल्यास त्यांचेकडून १० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करावा लागतो. मात्र तस्करी आपसी समजोता करुन रेतीऐवजी मुरुमाचे ५ हजार ४०० रुपये दंड करतात. तलाठी हे शासनाची दिशाभूल करतात. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.
तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याची गरज
साकोली तालुक्यातील बहुतांश तलाठी हे बाहेगावांहून ये-जा करतात. या तलाठयांचा ये-जा करण्याची वेळ रेती तस्करांना चांगल्याप्रकारे माहित असल्यामुळे नेमका या वेळेचा फायदा रेती तस्कर घेत आहेत. त्यामुळे त्या-त्या गावातील तलाठ्यांना मुख्यालयी सक्ती झाली तर रेती चोरीच्या घटनांवर आळा बसू शकेल, असे नागरिकांचे म्हणने आहे.
उत्खनन झालेल्या घाटांची चौकशी करण्याची मागणी
महालगांव, उमरी, लवारी, धर्मापुरी, मोहघाटा या रेती घाटतून किती ट्रक, ट्रॅक्टर रेतीची चोरी झाली याची चौकशी करुन संबंधीत अधिकाऱ्यांकडून तेवढ्या रेती चोरीची भरपाई वसुल करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Opening mining of Sakoliit sand, ballast, muruman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.