मंगळवारी फक्त तीन कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST2021-02-10T04:36:20+5:302021-02-10T04:36:20+5:30

भंडारा : जिल्ह्यात मंगळवारला दहा रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२ हजार ८९० ...

Only three corona positive on Tuesday | मंगळवारी फक्त तीन कोरोना पॉझिटिव्ह

मंगळवारी फक्त तीन कोरोना पॉझिटिव्ह

भंडारा : जिल्ह्यात मंगळवारला दहा रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२ हजार ८९० झाली आहे. दरम्यान आज तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ हजार ३२१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७६ टक्के आहे.

मंगळवारला २४७ व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. आतापर्यंत एक लाख २१ हजार ४४१ व्यकींच्या घशातील स्रावाची तपासणी करण्यात आली. पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये भंडारा तालुक्यातील २ व लाखनी तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. १०६ क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण ३२५ झाली आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ०२.४३ टक्के एवढा आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

Web Title: Only three corona positive on Tuesday