जिल्ह्यात साकोली व भंडारात केवळ तीन ॲक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:27+5:302021-07-20T04:24:27+5:30
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता भंडारा जिल्ह्यातील रुग्णसंख्या अगदी नगण्य झाली आहे. गत आठवडाभरापासून तर दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ...

जिल्ह्यात साकोली व भंडारात केवळ तीन ॲक्टिव्ह रुग्ण
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता भंडारा जिल्ह्यातील रुग्णसंख्या अगदी नगण्य झाली आहे. गत आठवडाभरापासून तर दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या निरंक येत आहे. परिणामी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात आता केवळ तीन ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ७९८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ५८ हजार ६६५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर ११३० व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला.
रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असली, तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. नागरिक कोरोना संसर्ग कमी झाल्यापासून बेजबाबदारपणे वागताना दिसत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, अनेकजण विनामास्क फिरताना दिसत आहेत. दुकानदारही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे.