एकमेव बालोद्यानाची झाली अधोगती

By Admin | Updated: May 12, 2017 01:51 IST2017-05-12T01:51:37+5:302017-05-12T01:51:37+5:30

ऐतिहासीक व प्राचीन नगर म्हणून ख्यातीप्राप्त पवनी गावात शेकडो मंदिर व कित्येक पर्यटनस्थळ आहेत.

The only childhood was born | एकमेव बालोद्यानाची झाली अधोगती

एकमेव बालोद्यानाची झाली अधोगती

अकरा वर्षापूवी निर्मिती : पवनीतील गौतम वॉर्डातील प्रकार, निधीची टंचाई, आबालवृद्धांना मनोरंजन नावापुरतेच
अशोक पारधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : ऐतिहासीक व प्राचीन नगर म्हणून ख्यातीप्राप्त पवनी गावात शेकडो मंदिर व कित्येक पर्यटनस्थळ आहेत. शेकडोच्या संख्येने असलेल्या मंदिांची देखभाल दुरूस्ती नगरवासीय लोकवर्गणीमधून करीत असतात परंतु पालिकेने गेल्या अकरा वर्षापुर्वी निर्माण केलेले गौतम वॉर्डातील एकमेव बालोद्यान दुर्लक्षित आहे.
लोकांमधून निवडून आलेले तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. योगेश रामटेके यांनी मोकळ्या असलेल्या शासकीय जागेचा सदूपयोग करून गौतम वॉर्डात बालोद्यान निर्माण केला होता. बालोद्यानात बालकांसाठी घसरपगुंडी, झुले, सीसॉ व अन्य साहित्य, पालकांना बसण्यासाठी सिमेंटच्या खुर्च्या, फवारा व फुलझाडे लावून सुसज्ज करण्यात आलेला होता. एक वर्षभर बालकांनी बालोद्यानात खूप मौज केली. त्यानंतर पालिकेने तारेचे कुंपन काढून आवारभिंत बांधकाम केले आणि बालोद्यानाला कुलूपबंद करून ठेवण्यात आले. बालोद्यानाच्या देखभालीसाठी पालिकेने बांधकाम करणाऱ्या कर्मचारी नियुक्त केला नाही किंवा बालोद्यानाला कंत्राटपद्धतीने चालवायला दिला नाही. त्यामुहे बालोद्यानातील साहित्याची नासूधस झाली.
फुलांची झाडे नाहिसी झाली त्याऐवजी गवत उगवले. बालोद्यानाचे निर्मितीसाठी पालिकेने दहा अकरा लक्ष रूपयाचा खर्च त्यावेळी केलेला होता.
पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पालिकेने दहा-अकरा रूपये पाण्यात गेले. तेवढ्या रक्कमेत शासकीय जागा ऐवजी पालिकेने आरक्षित केली.
नगराचा चेहरा मोहरा बदलवून विकास करण्याचे स्वप्न नगरविकास आघाडीने प्रचारादरम्यान लोकांना दाखविले. नागरिकांनी विश्वास ठेवून नगराध्यक्षासह बहुमतास नगरसेवक निवडून देवून नगर विकास आघाडीकडे विकासाची किल्ली सोपविली.
पालिकेत विरोधक औषधालासुद्धा नाहीत त्यामुळे विकास कामासोबतच बालकांचा त्या वयात खेळण्याचा हक्क पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी मिळवून देण्यासाठी बालोद्यानाची पुननिर्मिती करावी, अशी लोकांची अपेक्षा आहे.

Web Title: The only childhood was born

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.