अंगभूत क्षमताच महिलांना यशस्वी उद्योजिका बनवू शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST2021-03-13T05:04:28+5:302021-03-13T05:04:28+5:30

महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उमेदच्या तालुका व्यवस्थापक प्रिया ...

Only built-in ability can make a woman a successful entrepreneur | अंगभूत क्षमताच महिलांना यशस्वी उद्योजिका बनवू शकते

अंगभूत क्षमताच महिलांना यशस्वी उद्योजिका बनवू शकते

महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उमेदच्या तालुका व्यवस्थापक प्रिया सुखदेवे, पंचायत समिती भंडाराचे कृषी विस्तार अधिकारी विकास चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे, सांख्यिकीचे विस्ताराधिकारी एस.ए. वरगंटीवार, आर.डी. आंबोणे, धीरज गोस्वामी, आर.डी. काळबांदे, बी.के. बोदेले, एस.एफ. भुजाडे, वाय.एम. केकडे, डॉ. एस.आर. हजारे, नितीन साठवणे यांच्यासह तालुकास्तरीय समितीचे पदाधिकारी, ग्रमसंघाचे अधक्ष, सचिव, क्याडार, बी.एम.एम.यू. टीम, उमेदीच्या संयोजिका तसेच अन्य महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

यावेळी उमेदीच्या तालुका व्यवस्थापक प्रिया सुखदेवे यांनी विविध बचत गटांमार्फत महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनाविषयी माहिती दिली तसेच उमेदीच्या मार्फत ग्रामीण भागात महिलांचा वाढत असलेला सहभाग यावर मार्गदर्शन केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्वतःचा संसार सांभाळून सामाजिक कार्यासाठी योगदान देणाऱ्या विविध महिला बचत गटांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी भंडारा या समितीच्या गटविकास अधिकारी नूतन सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या कार्यशाळेत समितीमधील सर्व विभागप्रमुखांनी वेगवेगळ्या योजनांची उपस्थितांना माहिती दिली. संचालन किरण बोकडे यांनी केले. प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक प्रिया सुखदेवे यांनी, तर आभार सीएलएम मंगला बोरकर यांनी मानले.

Web Title: Only built-in ability can make a woman a successful entrepreneur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.