शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सरासरी १०५१.९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र या कालावधीत केवळ ७९४.३ मिमी पाऊस कोसळला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ६० टक्के असून अपेक्षित पावसाच्या ७६ टक्के आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. वैनगंगेसह नदी नाल्यांना महापूर आला होता. शेकडो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दरवर्षी दमदार कोसळणाऱ्या पावसाने यंदा भंडारा जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून केवळ रिमझिम श्रावण सरी तेवढ्या बरसत आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्केच पाऊस कोसळला आहे. जोरदार पाऊस बरसत नसल्याने धान पीक धोक्यात येण्याची शक्यता असून प्रकल्पात ही निम्माच जलसंचय झाला आहे. भंडारा जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सरासरी १०५१.९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र या कालावधीत केवळ ७९४.३ मिमी पाऊस कोसळला. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ६० टक्के असून अपेक्षित पावसाच्या ७६ टक्के आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. वैनगंगेसह नदी नाल्यांना महापूर आला होता. शेकडो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली होती. शेकडो घरांना ही फटका बसला होता. परंतु यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीचा काळ वगळता पावसाने दडी मारल्याचे दिसून येत आहे. गत १५ दिवसांपासून तर केवळ एक दोन दिवसा आड रिमझिम श्रावण सरी बरसत आहे. जिल्ह्यात धान पिकासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे. एकीकडे पावसाची दडी आणि दुसरीकडे वातावरणात प्रचंड उकाडा यामुळे धान पीक सुकण्याची स्थिती आहे. अनेक बांध्यांमध्ये पाणी आटले असून शेतकरी सिंचनासाठी धडपड करीत असल्याचे चित्र दिसत आहे. हवामान खात्याने येत्या चार दिवसात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. परंतु भंडारा जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस बरसला नाही. भंडारा तालुक्यात आतापर्यंत ६८२ मिमी, मोहाडी १००५.२ मिमी, तुमसर ७२२.७ मिमी, पवनी ७१६.१ मिमी, साकोली ८१३.५ मिमी, लाखांदूर ७४३.६ मिमी, लाखनी ८७७.० मिमी पाऊस झाला आहे. सरासरी ७९४.३ मिमी पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्केच पाऊस झाला आहे. दररोज सायंकाळच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी होते. परंतु श्रावणसरी काही काळ बरसतात आणि निघून जातात. जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसला आहे.

शेतशिवारात घुमतो इंजिनचा आवाज - पावसाने दडी मारल्याने धान पीक जगविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांनी आता डिझेल पंप लावले आहे. त्यामुळे शेतशिवारात डिझेल इंजिनचा आवाज घुमत आहे. डिझेलचे दर ९७ रुपये प्रति लिटर असल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पाऊस केव्हा बरसतो याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

 

टॅग्स :Rainपाऊस