भारनियमनामुळे आॅनलाईन दाखले झाले त्रासदायक
By Admin | Updated: August 25, 2014 23:48 IST2014-08-25T23:48:43+5:302014-08-25T23:48:43+5:30
ग्रामपंचायत कर्यालयाकडून पाहिजे असलेले, जन्म, मृत्यू रहिवासी, नाहरकत प्रमाणपत्र, बांधकामाची परवानगी, दारिद्ररेषे खाली दाखला असे विविध प्रकारचे दाखले आॅनलाईन झाले आहेत.

भारनियमनामुळे आॅनलाईन दाखले झाले त्रासदायक
जांब (लोहारा) : ग्रामपंचायत कर्यालयाकडून पाहिजे असलेले, जन्म, मृत्यू रहिवासी, नाहरकत प्रमाणपत्र, बांधकामाची परवानगी, दारिद्ररेषे खाली दाखला असे विविध प्रकारचे दाखले आॅनलाईन झाले आहेत. मात्र भारनियमनामुळे प्रमाणपत्र मिळत नसल्याची नागरिकांची ओरड आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाकडून पाहिजे असलेले सर्व दाखले आॅनलाईन देण्यात येतो. पण भारनियमनामुळे आॅनलाईन दाखले जनतेला वेळेवर मिळत नसल्याने अर्जेंट कामापासून वंचित राहावे लागतो. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भारनियमन केला जात आहे व याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्याचे ग्रामस्थाकडून बोलले जात आहे. सध्याच्या स्थितीत ग्रामस्थांना तसेच विद्यार्थ्यांना विविध दाखल्याची गरज भासत आहे. ग्रामपंचायतकडून पुर्वी प्रिंट केलेले दाखले, किंवा हातानी लिहून दिले जात होते. त्यावेळी जनतेला पाहिजे त्यावेळेस दाखला मिळत होता व जनतेचा, विद्यार्थ्यांचा काम वेळेवर होत होते. परंतु शासनाने आॅनलाईन दाखले देण्याचे आदेश असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवकाकडून सांगण्यात येत आहे.
शासनानी सर्व दाखले आॅनलाईन केले ही चांगली गोष्ट आहे पण ज्या भागामध्ये भारनियमन होत आहे. त्या भागातील जनतेला, विद्यार्थ्याला ग्रामपंचायतकडून पाहिजे असलेले दाखले वेळेवर मिळत नसल्याने दाखले त्रासदायक ठरत आहे. (वार्ताहर)