ईकॉर्नियाच्या एका रोपापासून एक हजार बिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 06:00 AM2019-08-24T06:00:00+5:302019-08-24T06:00:37+5:30

वैनगंगा नदीच्या पात्राला आपल्या कवेत घेणारी ईकॉर्निया ही वनस्पती अत्यंत घातक असून प्रत्येक वर्षी एका रोपासून एक हजार बीया निर्माण होतात. त्यामुळे काही दिवसातच ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढून जैववैविधतेला धोका पोहचविते. या वनस्पतीचे शास्त्रीय पद्धतीने निर्मूलन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

One thousand seeds from one plant of echornia | ईकॉर्नियाच्या एका रोपापासून एक हजार बिया

ईकॉर्नियाच्या एका रोपापासून एक हजार बिया

googlenewsNext
ठळक मुद्देघातक वनस्पती : वैनगंगा नदीपात्र ईकॉर्नियाने व्यापले, उपाययोजनांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैनगंगा नदीच्या पात्राला आपल्या कवेत घेणारी ईकॉर्निया ही वनस्पती अत्यंत घातक असून प्रत्येक वर्षी एका रोपासून एक हजार बीया निर्माण होतात. त्यामुळे काही दिवसातच ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढून जैववैविधतेला धोका पोहचविते. या वनस्पतीचे शास्त्रीय पद्धतीने निर्मूलन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ईकॉर्निया क्रासीपस ही पाण्यावर तरंगणारी जलीय वनस्पती आहे. ही वनस्पती मुख्यत: दक्षिण अमेरिकेची आहे. या वनस्पतीचे पाने जाळ, चमकदार आणि वनस्पती एक मीटर उंच असते. एका रोपाला आठ ते दहा आकर्षक गुलाबी फुले येतात. भारतात ही वनस्पती १९८० च्या काळात आढळून आली. आता ती संपूर्ण देशात पसरली आहे.
भंडारा जिल्ह्यातील नदी-नाल्यातही ईकॉर्निया मोठ्या प्रमाणात दिसून येते. वैनगंगेचे संपूर्ण पात्र या ईकॉर्नियाने व्यापले आहे. उन्हाळ्यात तर लॉनसारखे दृश्य नदीपात्राचे दिसत होते.
अत्यंत घातक असलेली ही वनस्पती प्रवाहाला अडथडा निर्माण करते आणि सुर्यप्रकाशाची किरणे दुसऱ्या जलीय वनस्पतीला मिळू देत नाही. त्यामुळे इतर वनस्पतीचा नाश होतो. तसेच जलचर प्राण्यांच्या जीवन चक्रावरही त्याचा परिणाम होतो. जैववैविधतेला धोका ठरणाºया या ईकॉर्नियाचे एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीने नियंत्रण करण्याची गरज आहे. त्यासाठी जैविक, यांत्रिक उपाय आवश्यक आहे.
यांत्रिक उपायांमध्ये ईकार्नियाचे हालचाली थांबविण्याकरिता बुम्स, तरंगणारे किंवा स्थिर आडकाठींचा उपयोग करण्याची गरज आहे. त्यामुळे वनस्पती इकडून तिकडे पसरणार नाही.
वैनगंगा नदीत अशी कोणतीही व्यवस्था नसल्याने पुराच्या पाण्यामुळे ही वनस्पती सर्वत्र पसरत आहे. लहान पुलाजवळ तर ती मोठ्या प्रमाणात अडकली दिसून येते. नदीपात्रातून ईकॉर्नियाचे निर्मूलन करण्यासाठी दोन कोटी रूपयांचा निधीही मंजूर झाला आहे.

ईकॉर्नियाचे मोठे दुष्परिणाम आहे. यांत्रिक आणि जैविक पद्धतीने निर्मूलन करता येते. ईकॉर्नियावर पाने खाणारे कीटक दिसून येतात. त्यापैकी नीओकेटीनस ब्रुची व नी इकोरनी हे कीटक वनस्पती खाऊन नष्ट करतात.
-डॉ. पी.बी. मेश्राम, शास्त्रज्ञ, ट्रॉपीकल फॉरेट रिसर्च इन्स्टिट्यूट.

Web Title: One thousand seeds from one plant of echornia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी