सोमवारी एक रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:37+5:302021-08-24T04:39:37+5:30

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५८ हजार ९३९ झाली आहे. आज एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आला. पॉझिटिव्ह रुग्णांची ...

One patient positive on Monday | सोमवारी एक रुग्ण पॉझिटिव्ह

सोमवारी एक रुग्ण पॉझिटिव्ह

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५८ हजार ९३९ झाली आहे. आज एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आला. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६० हजार ७८ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के आहे. आतापर्यंत ४ लाख ४५ हजार ९७८ व्यक्तींच्या घशातील स्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात ६० हजार ७८ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. भंडारा तालुक्यात आज एक रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण ११३३ झाली आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर ०१.८९ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ ०.०१ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्री-स्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

Web Title: One patient positive on Monday