अवघ्या पंधरा दिवसांत एक लाखावर कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:35 IST2021-04-17T04:35:40+5:302021-04-17T04:35:40+5:30

बॉक्स १६ मृत्यू, १,३९३ पॉझिटिव्ह जिल्ह्यात शुक्रवारी १६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, तर १,३९३ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आठ ...

One lakh corona tests in just fifteen days | अवघ्या पंधरा दिवसांत एक लाखावर कोरोना चाचणी

अवघ्या पंधरा दिवसांत एक लाखावर कोरोना चाचणी

बॉक्स

१६ मृत्यू, १,३९३ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात शुक्रवारी १६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, तर १,३९३ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आठ हजार ५४२ व्यक्तींची चाचणी केल्यानंतर त्यात भंडारा तालुक्यात ५९३, मोहाडी ९१, तुमसर १८८, पवनी १६४, लाखनी १४६, साकोली १६२ आणि लाखांदूर तालुक्यात ८९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात १६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात भंडारा तालुक्यात आठ, पवनी तीन, मोहाडी दोन, तर तुमसर, लाखनी आणि साकोली तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

बॉक्स

१२ हजार ६१२ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत ३५ हजार ११५ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाला असून, त्यापैकी २१ हजार ९९३ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर ५१० जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १२ हजार ६१२ व्यक्ती ॲक्टिव्ह आहेत. त्यात भंडारा तालुका पाच हजार एक, मोहाडी १,०९१, तुमसर १,५२५, पवनी १,६९१, लाखनी १,३२६, साकोली १,१३८ आणि लाखांदूर तालुक्यात ८४० रुग्ण आहेत. जिल्ह्याचा मृत्यू दर १.४५ टक्का आहे.

Web Title: One lakh corona tests in just fifteen days