राजेगाव येथे ट्रक अपघातात एक ठार, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:28 IST2018-09-10T22:28:21+5:302018-09-10T22:28:37+5:30

One killed, two seriously injured in a truck accident in Rajegaon | राजेगाव येथे ट्रक अपघातात एक ठार, दोन गंभीर

राजेगाव येथे ट्रक अपघातात एक ठार, दोन गंभीर

ठळक मुद्देट्रकचा चुराडा : टायर फुटल्याने राष्ट्रीय महामार्गावर उलटला ट्रक

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : भरधाव ट्रकचा अचानक टायर फुटून झालेल्या अपघातात वाहक जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील राजेगाव एमआयडीसी येथे सोमवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकचा पुर्णत: चुराडा झाला.
रातकुमारदास (२५) असे मृताचे नाव आहे. तर दोबरना सुबल देबनाथ (२६) रा. संतोषपूर जिल्हा नंदीया आणि बंकू शंभू दास (२३) रा. उत्तर दुलभपूर, पश्चिम बंगाल अशी जखमींची नावे आहेत.पश्चिम बंगाल येथून ट्रक क्रमांक डब्ल्यू बी २५ एच ७५६० हा बारा चाकाचा मोठा ट्रक लोखंड घेवून रविवारी पहाटे नागपूरकडे जात होता. राजेगाव एमआयडीसी जवळ ट्रकचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण गेले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला जावून उलटला. अपघात एवढा भीषण होता की ट्रकचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात वाहक रातकुमार हा जागीच ठार झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झो. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लाखनी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Web Title: One killed, two seriously injured in a truck accident in Rajegaon