दुचाकीच्या धडकेत एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST2021-04-15T04:34:03+5:302021-04-15T04:34:03+5:30
आदिल अहेसान अंसारी (१७) असे मृताचे तर तेजस सुनील ढेंगे (१७) रा. केसलवाडा (वाघ) असे गंभीर जखमीचे नाव आहे. ...

दुचाकीच्या धडकेत एक ठार, एक गंभीर
आदिल अहेसान अंसारी (१७) असे मृताचे तर तेजस सुनील ढेंगे (१७) रा. केसलवाडा (वाघ) असे गंभीर जखमीचे नाव आहे. मंगळवारी रात्री जेवणानंतर आदिल व तेजस लाखनी रस्त्याने फिरायला गेले. त्यानंतर ते दोघे रस्त्याच्या कडेला बसून गप्पा करीत बसले. त्यावेळी लाखनीकडून भरधाव वेगाने दोन दुचाकी आल्या. काही कळायच्या आता रस्त्याच्या कडेला बसलेल्या या दोघांना धडक दिली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. प्रथमोपचार करून सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले. उपचारादरम्यान आदिल अंसारीचा मृत्यू झाला. लाखनी पोलिसांनी मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे यांच्या मार्गदर्शनात प्रमोद बागडे, विठ्ठल हेडे तपास करीत आहेत.