लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर/खरबी : जवाहरनगरहून ठाणा पेट्रोलपंपकडे जाणाºया दुचाकीला समोरून येणाºया चारचाकीने जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक मनोज लक्ष्मण सावरकर (५०) हा जागीच ठार झाला तर पत्नी सोनाली सावरकर (३५) मुलगी जिया (५) गंभीर जखमी झाले. ही घटना ठाणा जवाहरनगर रोडवर रात्री ८.३० वाजता सुमारास विद्युत खांब क्रमांक ५४५ व ५४६ दरम्यान घडली. अज्ञात कारचालकाविरूद्ध पोलिसात गुन्हाची नोंद करण्यात आली.मनोज सावरकर (४०) व पत्नी सोनाली सावरकर (३५) मुलगी जिया सावरकर (५) हे राहणार तिघेही सुयोगनगर (जवाहरनगर) दुचाकी क्रमांक एमएच ३१ डीयु १५८५ ने जवाहरनगर सुयोगनगरहुन ठाणा पेट्रोलपंप दिशेने जात होते. रस्ता ओलांडताना ठाणाहून जवाहरनगरकडे जाणाºया चारचाकी वाहन क्रमांक सीजी ०४ एचए ८३७० कारने दुचाकीस जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक मनोज सावरगर जागीच ठार झाला. तर पत्नी सोनाली मुलगी जिया गंभीर जखमी अवस्थेत सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचे दर्शनी भाग अक्षरसहा चुराडा झाला. घटना स्थळाहून कारचालक पोबारा झाला. फिर्यादी माधुरी जगदीश सावरकर (२८) रा. सुयोगनगर यांच्या तक्रारीहुन जवाहरनगर पोलिसात अज्ञात कारचालकाविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
कार-दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:50 IST
जवाहरनगरहून ठाणा पेट्रोलपंपकडे जाणाºया दुचाकीला समोरून येणाºया चारचाकीने जोरदार धडक दिली.
कार-दुचाकी अपघातात एक ठार
ठळक मुद्देदोन जखमी : ठाणा-जवाहरनगर रोडवरील घटना