दुचाकी अपघातात एक ठार; दोन जखमी
By Admin | Updated: June 11, 2016 00:31 IST2016-06-11T00:31:22+5:302016-06-11T00:31:22+5:30
भंडारा- वरठी राज्यमार्गावरील दाभा गावाजवळ भरधाव दुचाकी ऐकमेकावर आदळल्याने झालेल्या अपघातात एक तरूणाचा जागीच मृत्यू झाला.

दुचाकी अपघातात एक ठार; दोन जखमी
वरठी : भंडारा- वरठी राज्यमार्गावरील दाभा गावाजवळ भरधाव दुचाकी ऐकमेकावर आदळल्याने झालेल्या अपघातात एक तरूणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक तरूण गंभीर जखमी असून एकाला किरकोळ दुखापात झाली. ही घटना शुक्रवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
निलेश खुशाल वासनिक (२७) रा. बल्लारपूर जि.चंद्रपूर हा दुचाकी क्रमांक एम.एच.३४ ए.जी. १३६४ ने तुमसरकडे तर तुमसर येथील हरीश खोब्रागडे (३५) व सचिन गभने (२५) हे दोघे दुचाकीने भंडाराकडे जात होते. दरम्यान दाभा या गावाजवळ दोन्ही दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक दिली.
यात निलेश वासनिक यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला. नितीन गभने याला गंभीर दुखापत झाली असून त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. त्याचा सहकारी हरीष खोब्रागडे याच्यावर भंडारा येथे उपचार सुरु आहे.
या अपघातात दोन्ही वाहनाचा पुर्णपणे चेंदामेंदा झाला. भरधाव वाहनावरून चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुधिर वर्मा ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले. यावेळी पोलीस हवालदार नंदकिशोर योगेश मोहतुरे यांनी काही नागरिकांच्या मदतीने जखमींना रूग्णालयात हलविले. याप्रकरणी वरठी पोलिसांनी मोटारवाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. (वार्ताहर)