जिल्ह्यात एकाचा मृत्यू, ४६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:35 IST2021-01-03T04:35:26+5:302021-01-03T04:35:26+5:30

शनिवारी ३५२ व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ४६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यात ...

One death in the district, 46 positive | जिल्ह्यात एकाचा मृत्यू, ४६ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात एकाचा मृत्यू, ४६ पॉझिटिव्ह

शनिवारी ३५२ व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ४६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यात भंडारा तालुक्यातील २१, मोहाडी २, तुमसर ६, पवनी १, लाखनी ८ , साकोली ८ व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत एक लाख सहा हजार १२ व्यक्तींच्या घशातील स्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात १२ हजार ४४२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या असून ११ हजार ७७३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. ३७७ क्रियाशील रुग्ण आहेत. शनिवारी कोरोनाने एका रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण २९२ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७२ टक्के आहे. तर मृत्युदर २.३५० टक्के एवढा आहे.

Web Title: One death in the district, 46 positive