एकाच पुलाचे दोनदा बांधकाम होणार

By Admin | Updated: January 11, 2015 22:45 IST2015-01-11T22:45:30+5:302015-01-11T22:45:30+5:30

तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील लघु पाठबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेले पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाला वळते करण्यात आली आहेत. सिंचन क्षमता वाढल्याने हा निर्णय

One bridge will be constructed twice | एकाच पुलाचे दोनदा बांधकाम होणार

एकाच पुलाचे दोनदा बांधकाम होणार

दुरूस्तीचा अभाव : लक्षावधी रूपयांचा निधी खर्च
चुल्हाड/सिहोरा : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील लघु पाठबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेले पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाला वळते करण्यात आली आहेत. सिंचन क्षमता वाढल्याने हा निर्णय घेण्यात आलेला असून प्रशासकीय यंत्रणेजवळ दुरूस्तीचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.
तुमसर-बपेरा राज्य मार्गाला लघु पाठबंधारे विभागाचे नहर आणि कालवे आहेत. जलाशयाचे पाणी या कालव्यांनी वाटप करण्यात येत आहेत. जलाशय सातपुडा पर्वत रांगाच्या जंगलात असून पाणी वाटपाचे क्षेत्र वैनगंगा नदी काठालगत असणाऱ्या शेती पर्यंत आहे. उजवा कालवा ३९६९ हेक्टर आणि डावा कालवा ३०६८ हेक्टर आर शेती सिंचित करणारा क्षेत्र आहे. ७०२९ हेक्टर आर नियमित सिंचित क्षेत्र असला तरी १४९३८ हेक्टर आर प्रकल्पाचे एकूण समावेश क्षेत्र आहे. हा आकडा सर्वेक्षणातून यंत्रणे मार्फत उपलब्ध करण्यात आलेला आहे.
याशिवाय बपेरा शिवारातील क्षेत्र पुन्हा जोडण्यात आल्याने समावेश क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्या दिशेने आधी पाठबंधारे विभागाने पाऊले उचलली आहेत. या वाढीव सिंचित क्षेत्रात पाणी पुरवठा करण्यासाठी तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील पुलाची दुरूस्ती गेल्या २ वर्षात करण्यात आली आहे.
सिहोरा आणि रनेरा गावात पुलांची रूंदी वाढविण्यात आली आहे. या शिवाय चुल्हाड, देवसर्रा गावातील पुलाची स्थिती जैसे थे आहे, असे करीत असताना मागील दोन वर्षात लक्षावधी खर्च करण्यात आले आहे. समादेस क्षेत्र वाढत असताना दुरदृष्टी ठेवून विकास कामाचे नियोजन करण्यात येत नाही.
रनेरा गावात पुलाचे पुन्हा नुतनीकरण करण्यात येत आहे. या पुल बांधकामात स्लॅब देण्यात येणार आहे. पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग (राज्य) कडे वळते करण्यात आले आहे. यामुळे एकाच पुलाचे दोनदा बांधकाम करताना पाठबंधारे विभागाच्या तिजोरी आणि निधीला फटका बसणार आहे. (वार्ताहर)

Web Title: One bridge will be constructed twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.