नागरिकांची दीड कि.मी. पायपीट

By Admin | Updated: July 16, 2015 00:51 IST2015-07-16T00:51:51+5:302015-07-16T00:51:51+5:30

गतीमान प्रशासनाचा दावा करणाऱ्या महसूल विभागाने तुमसर तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय दीड कि.मी. अंतरावर शहराबाहेर स्थानांतरीत केले आहे.

One and a half km of citizens Footpath | नागरिकांची दीड कि.मी. पायपीट

नागरिकांची दीड कि.मी. पायपीट

एसडीओ कार्यालयाच्या स्थानांतरणामुळे फटका : जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधी अनभिज्ञ
तुमसर : गतीमान प्रशासनाचा दावा करणाऱ्या महसूल विभागाने तुमसर तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय दीड कि.मी. अंतरावर शहराबाहेर स्थानांतरीत केले आहे. ९ फेब्रुवारीपासून कार्यालय स्थानांतर झाल्याने शेकडो सामान्य नागरिकांना मनस्ताप करावा लागतो.
तहसीलदारांचे निवासस्थानाची दूरवस्था झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या इमारतीत उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय सुरु करण्याची गरज आहे.
जिल्हा प्रशासनाने दीड वर्षापूर्वी तुमसर शहरात तहसील कार्यालयात उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय सुरु केले होते. ज्यामुळे भंडाऱ्याची कामे तुमसरात होऊ लागली. परंतु ९ फेब्रुवारी पासून हे कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ भाड्याच्या इमारतीत स्थानांतरीत करण्यात आले. तहसील कार्यालय ते बाजार समिती हे अंतर किमान दीड ते दोन कि.मी. आहे.
सामान्य नागरिकांना सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयात अपडेट केल्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरी करीता जावे लागते. हे कार्यालय स्थानांतरीत करण्यापूर्वी तहसील कार्यालयाजवळ एका इमारतीत कार्यालय सुरु करावे अशी विनंती करण्यात आली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून बाजार समितीजवळ हे कार्यालय हलविण्यात आल्यामुळे नागरिकांना त्रास सहन होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

तहसीलदारांचे निवासस्थानाची दुरवस्था
तहसील कार्यालयाच्या मागे तहसीलदारांची निवासस्थान (सदनिका) आहे. त्याची दूरवस्था झाली असून ती इमारत जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. या इमारतीची दुरुस्ती करून येथे उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय सुरु करण्याची गरज आहे. यामुळे नागरिकांना पायपीट करावे लागणार नाही. जिल्हा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी येथे लक्ष देण्याची गरज आहे. सामान्य नागरिकांच्या सेवेकरिता कार्यालय आहेत. त्यांच्या त्रासाकरिता नाहीत याचा विसर प्रशासनाला पडल्याचे दिसते.

Web Title: One and a half km of citizens Footpath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.