एक, दोन रूपयांच्या नोटा चलनातून बाद!
By Admin | Updated: June 19, 2015 01:03 IST2015-06-19T01:03:46+5:302015-06-19T01:03:46+5:30
भारतीय रिझर्व्ह बँकेने एक आणि दोनच्या नोटा दैनंदिन व्यवहारातून बाद केल्यामुळे लग्नसमारंभ धार्मिक कार्यात...

एक, दोन रूपयांच्या नोटा चलनातून बाद!
भंडारा : भारतीय रिझर्व्ह बँकेने एक आणि दोनच्या नोटा दैनंदिन व्यवहारातून बाद केल्यामुळे लग्नसमारंभ धार्मिक कार्यात ११, २१ व ५१ रुपये देगणीच्या रूपात देणाऱ्यांपुढे समस्या निर्माण झाली आहे.
काही वर्षापूर्वी एक व दोनच्या नोटांची नव्याने छपाई बंद करण्यात आली. तेव्हा नोटा जीर्ण होईपर्यंत त्या चलनात होत्या. हे रुपये बंद केल्याने आज कोट्यवधीचे चलन धूळखात पडले असून दैनंदिन व्यवहारामध्ये तुटवडा भासू लागला आहे. १, २ व ५ च्या नाण्याचा सुद्धा तुटवडा आहे. आज एक व दोनच्या कोऱ्या करकरीत नोटा देऊ केल्या तरीही कोणीही घ्यायला तयार नाही. सध्या एक दोन व पाचची नाणी व्यवहारात चालत असून या नाण्याचाही तुटवडा जाणवत आहे. पाचची नोट चांगली असेल तर ती चालते. एक व दोनची नोटा का चालत नाही. एक व दोनची नाणी चालत असताना नोटा का चालत नाही असा प्रश्न नागरिकांना नेहमी पडतो. त्यामुळे याविषयी मते जाणून घेण्यासाठी टपरीधारक व लहान व्यवसायिकांशी चर्चा केली असता एक टपरीधारकाने सांगितले की, एक आणि दोनच्या नोटा व्यवहारात नसल्याने आमच्याकडून कुणी घेत नाही. त्यामुळे आम्ही या नोटा घेणे बंद केल्याचे त्याने सांगितले.
एक आणि दोनच्या नोटाबरोबर पाच रूपयांच्या नोटांची कहाणी काही वेगळी नाही. कारणे काही जरी असली तरी एक-दोन आणि पाच रूपयांचा नोटा व्यवहारातून बाद झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक जण असलेल्या नोटा एखाद्या समारंभात लिफाफ्यात देत असतात किंवा पर्समध्ये शोभेसाठी ठेवत असतात. (नगर प्रतिनिधी)