हवाई सफरसाठी ओमची निवड
By Admin | Updated: June 20, 2017 00:18 IST2017-06-20T00:18:11+5:302017-06-20T00:18:11+5:30
‘लोकमत संस्कार मोती’ २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमात नागपूर-दिल्ली या हवाई सफरसाठी साकोली येथील ओम राजेशसिंह बैस याची निवड झाली आहे.

हवाई सफरसाठी ओमची निवड
लोकमत संस्कार मोती स्पर्धा : कटकवार विद्यालयाचा विद्यार्थी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘लोकमत संस्कार मोती’ २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमात नागपूर-दिल्ली या हवाई सफरसाठी साकोली येथील ओम राजेशसिंह बैस याची निवड झाली आहे. तो साकोली येथील कृष्णमुरारी कटकवार शाळेचा इयत्ता आठव्या वर्गाचा विद्यार्थी आहे.
शालेय विद्यार्थ्यांचे सुप्त गुण वाढावे, यासाठी लोकमत परिवाराच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असते. लोकमत संस्कार मोती २०१६ मध्ये शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
ही स्पर्धा १ जुलै ते १० आॅक्टोंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.
यात सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांना लोकमत परिवारातर्फे बक्षीस व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. याच स्पर्धेत जिल्हानिहाय एका विद्यार्थी स्पर्धकाची नागपूर ते दिल्ली-नागपूर हवाई सफरसाठी निवड करण्यात येणार होती.
त्या अंतर्गत हवाई सफसाठी साकोली येथील कृष्णमुरारी कटकवार स्कूलचा विद्यार्थी ओम बैस याची निवड करण्यात आली आहे. ही हवाई सफर एक दिवसाची असून ती २१ जूनला होणार आहे. या हवाई सफरसाठी ओमला नागपूर येथून दिल्ली व परत नागपूरपर्यंत असा होणारा प्रवासाचा खर्च लोकमत परिवार उचलणार आहे.