वाघाची कातडी तस्करीत ओडिशातील पुढाऱ्याचा सहभाग

By Admin | Updated: September 4, 2014 23:34 IST2014-09-04T23:34:39+5:302014-09-04T23:34:39+5:30

वाघ, बिबट कातडी तस्करी प्रकरणी ओडीशातील हनुमंत साहू याला ३० आॅगस्टला अटक केली होती. वनकोठडीदरम्यान त्याने यातील मुख्य आरोपीचे नाव वनाधिकाऱ्यांना सांगितले आहे. राजकीय पक्षाशी

Odisha leader who participated in Tiger smuggling | वाघाची कातडी तस्करीत ओडिशातील पुढाऱ्याचा सहभाग

वाघाची कातडी तस्करीत ओडिशातील पुढाऱ्याचा सहभाग

दोन दिवसांत होणार अटकेची कारवाई : ताब्यातील हनुमंतने दिली माहिती
प्रशांत देसाई - भंडारा
वाघ, बिबट कातडी तस्करी प्रकरणी ओडीशातील हनुमंत साहू याला ३० आॅगस्टला अटक केली होती. वनकोठडीदरम्यान त्याने यातील मुख्य आरोपीचे नाव वनाधिकाऱ्यांना सांगितले आहे. राजकीय पक्षाशी निगडीत असलेल्या या मुख्य आरोपीला दोन दिवसात अटकेची कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहे.
विदर्भ वनसंपदेने नटलेला आहे. भंडारा, अमरावती, गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही वर्षात अनेक वनप्राण्यांची शिकार झाल्या आहेत. यात वाघाच्या शिकारीचे प्रमाण अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात आहेत.
वनविभागाने ओडीशा येथून हनुमंत साहू याला वनप्राण्यांच्या शिकार व कातडीची तस्करी प्रकरणी ३० आॅगस्टला अटक केली. त्यानंतर तो भंडारा वनविभागाच्या ताब्यात आहे. वनकोठडी दरम्यान त्याने कातडीच्या तस्करीत त्याचा केवळ सहभाग असून याचा मुख्य आरोपी ओडीशातील एका राजकीय पक्षाशी संबंध असलेला पदाधिकारी असल्याची माहिती ताब्यात असलेल्या हनुमंत या आरोपीने दिली आहे.
मिळालेल्या माहितीवरून वनविभागाने संबंधित मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आलेल्या व्यक्तीशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला आहे. सदर व्यक्तीची त्याच्या परिसरात राजकीय वलय असल्याने पोलीस तिथे पोहचून त्याला अटकेची कारवाई केल्यास त्याच्या राजकीय पार्श्वभूमीला धोका निर्माण होणार असल्याने तो स्वत:च भंडारा वनविभागाकडे आत्मसमर्पण करणार असल्याची तयारी दर्शविली आहे. येत्या दोन दिवसात सदर वाघाच्या कातडीचा तस्कर स्वत: भंडारा येथे दाखल न झाल्यास पोलिसांच्या सहकार्याने त्या आरोपीला ओडीशा येथून अटक करून आणण्यासाठी वनविभाग सज्ज झालेला आहे.

Web Title: Odisha leader who participated in Tiger smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.