बाबुजींच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबीर २ जुलै रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:50 IST2019-06-29T22:49:55+5:302019-06-29T22:50:15+5:30

ज्येष्ठ स्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी सोमवारला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर येथील राजीव गांधी चौक स्थित युनियन बँकेमागील बचपन अ प्ले स्कूल येथे आयोजित केले आहे.

On the occasion of Babuji's birth anniversary, | बाबुजींच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबीर २ जुलै रोजी

बाबुजींच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबीर २ जुलै रोजी

ठळक मुद्देउपक्रम । लोकमत व डॉ.हेडगेवार रक्तपेढी सेंटरचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ज्येष्ठ स्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी सोमवारला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर येथील राजीव गांधी चौक स्थित युनियन बँकेमागील बचपन अ प्ले स्कूल येथे आयोजित केले आहे.
या उपक्रमात शहरातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थाही सहभागी होणार आहेत. रक्तदान म्हणजेच जीवनदान, रक्तदान केल्याने माणूस अशक्त होत नाही तर माणुसकी सशक्त होते.
शिबिरात दिलेल्या वेळेत सहभागी होता येईल. या रक्तदान शिबिरात महाविद्यालयीन युवक, युवती, महिला, सरकारी, खासगी नोकरीतील, सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी तथा शासकीय व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन रक्तदान करू शकतात.
अधिक माहितीकरिता कार्यक्रम संयोजक (९०९६०१७६७७), सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) किंवा लोकमत शाखा व्यवस्थापक मोहन धवड (९८५०३०४१४३) यांच्याशी संपर्क साधता येईल.
लोकमत सखी मंच, वाचकांना आवाहन
बाबुजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात सखी मंच, लोकमतचे कर्मचारी, वार्ताहर, प्रतिनिधी, विक्रेते बंधू व वाचक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ.हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान करणाºया प्रत्येक रक्तदात्यास ब्लड डोनर कार्ड चे प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात येईल.

Web Title: On the occasion of Babuji's birth anniversary,