अंगणवाडी मदतनीस निवडीच्या प्राथमिक यादीवर आक्षेप
By Admin | Updated: November 15, 2015 00:22 IST2015-11-15T00:22:47+5:302015-11-15T00:22:47+5:30
एकात्मिक बालविकास प्रकल्प साकोली अंतर्गत सानगडी क्रमांक ४ अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीवरील प्राथमिक यादीवर आक्षेप घेण्यात आला आहे.

अंगणवाडी मदतनीस निवडीच्या प्राथमिक यादीवर आक्षेप
सानगडी : एकात्मिक बालविकास प्रकल्प साकोली अंतर्गत सानगडी क्रमांक ४ अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीवरील प्राथमिक यादीवर आक्षेप घेण्यात आला आहे. हा आक्षेप शुभांगी भेंडारकर यांनी घेतला असून बालविकास अधिकारी साकोली यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय साकोली यांनी सानगडी क्रमांक ४ अंगणवाडी मदतनिससाठी मुलाखती घेतल्या. दि.६ नोव्हेंबरला उमेदवारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर शुभांगी भेंडारकर यांनी आक्षेप घेतला आहे. मदतनिस पदासाठी शुभांगी भेंडारकर यांनी विहित नमुन्यात अर्ज सादर केला. त्यांनी अर्जासोबत सातवी, दहावी, बारावी, बी.ए., डी.एड., एम.ए. अपिअर, अनुभव प्रमाणपत्र, संगणक प्रशिक्षक यांच्या झेरॉक्स जोडल्या. प्राथमिक यादी दि.६ नोव्हेंबर रोजी सातवी, दहावी व बारावी या गुणांचा विचार करून प्रकाशित करण्यात आली.
जाहिरातीतील क्रमांक ४ च्या सचनेप्रमाणे अर्जदारांनी शैक्षणिक अर्हतेसंंधात उच्चतम अर्हतेबाबतचे गुणपत्रिकांच्या व डी.एड. बी.एड. असल्यास सदर प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. या अनुषंगाने उच्चत्तम अर्हतेबाबतचे सर्व कागदपत्रे जोडण्यात आले. जाहिरातीतील सूचना क्रमांक ९ च्या अनुषंगाने प्राथमिक यादी तयार केली गेली नाही.
मदतनीस पदासाठी इयत्ता ७ वी उत्तीर्ण असल्याची न्यूनतम शैक्षणिक पात्रता आहे. गुणवत्ता विचारात घेवून यादी तयार केली गेली नाही जर मदतनीस पदासाठी उच्चत्तम शिक्षण हवे असेल तर न्यूनतम शिक्षणाची अट का देण्यात आली. इयत्ता ७ वी, १० वी, १२ वी मधील गुणांची सरासरी काढून गुणवत्ता यादी तयार करायची होती. तसेच जाहिरातीत त्यासंबंधी सूचना का देण्यात आली नाही, असे प्रश्न शुभांगी भेंडारकर यांनी उपस्थित केले आहे. पदाचा विचार न करता न्यूनतम शिक्षणाचाच विचार करून गुणवत्ता यादी का तयार करण्यात आली नाही. उच्च शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना या लहान पदावर काम करण्यास धजावत नाही मग शासनाने हे उच्च विद्याविभूषित आहेत म्हणून त्यांना डावलण्याची भूमिका का घ्यावी, अंगणवाडी हा शैक्षणिक प्रवाह निर्माण करणारा निर्झर आहे. या प्रवाहात उच्चविद्या विभूषीतांची भर पडल्यास हा शैक्षणिक प्रवाह अधिक दर्जेदार आणि सक्षम होईल. इयत्ता ७ वी आजच्या काळात किमान अर्हता आहे.
या अर्हतेधारकांचा प्रतिस्पर्धी उच्च विद्याविभूषीत असल्यास केवळ न्यूनतम पात्रतेचा विचार न करता उच्चत्तम शैक्षणिक पात्रतेचा विचार होणे काळानुरूप योग्य राहील. प्राथमिक यादीवरील आक्षेप विचारात घेऊन फेरतपासणी करावी व गुणवत्ता यादी तयार करावी, अशी मागणी भेंडारकर यांनी केली आहे. (वार्ताहर)