पिपरी येथे पोषण पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:35 IST2021-03-26T04:35:33+5:302021-03-26T04:35:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : एकात्मिक बालविकास प्रकल्प, भंडारा शाखा शहापूर अंतर्गत तालुक्यातील पिपरी येथील अंगणवाडी क्रमांक १ व ...

पिपरी येथे पोषण पंधरवडा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एकात्मिक बालविकास प्रकल्प, भंडारा शाखा शहापूर अंतर्गत तालुक्यातील पिपरी येथील अंगणवाडी क्रमांक १ व २ येथे बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल निकोसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोषण पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पर्यवेक्षिका सुधा कालेश्वर, व्ही. पी. मेश्राम, वृंदा कारेमोरे, सीमा चौरागडे आदी उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांनी आरोग्य तसेच महिलांच्या व्ही. एच. एस. एम. डी.विषयी मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रास्ताविक सुधा कालेश्वर यांनी केले. सूत्रसंचालन उषा गाढवे यांनी केले तर सुरेखा लांबट यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला सोनिया चवरे, कुंदा चवरे, सुजाता चवरे, रंजना तितीरमारे, मंगेश वासनिक तसेच गरोदर माता, स्तनदा माता यांनी विशेष सहकार्य केले.