नूतन कन्याची हर्षदा परमारे अव्वल
By Admin | Updated: June 7, 2016 07:30 IST2016-06-07T07:30:31+5:302016-06-07T07:30:31+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल सोमवारी दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित केला.

नूतन कन्याची हर्षदा परमारे अव्वल
दहावीचा निकाल ८४ टक्के : मुलींचीच भरारी, लाखनी आघाडीवर, तुमसर पिछाडीवर
भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल सोमवारी दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित केला. जिल्ह्याचा निकाल ८४.०२ टक्के लागला. भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची हर्षदा यादवराव परमारे हीने ९८ टक्के गुण मिळवित जिल्ह्यात अव्वल क्रमांक प्राप्त केला.
द्वितीय क्रमांक समर्थ विद्यालय लाखनीचा प्रज्योत राजेश गजभिये (९६.६०) तर तृतीय क्रमांक संयुक्तरीत्या नंदलाल पाटील कापगते विद्यालयाचा चेतन पुस्तोडे व नुतन कन्या विद्यालयाची मृदुला उमलकर हिने प्राप्त केला. दोन विद्यार्थ्यांना ९६.४० टक्के गुण मिळाले आहेत.
निकालात नागपूर विभागातून चौथ्या स्थानावर असलेल्या भंडारा जिल्ह्यात यावर्षी मुलींनी निकालात भरारी घेतली आहे. भंडारा जिल्ह्यात दहावीच्या २८६ शाळा आहेत. यावर्षी जिल्ह्यातून २०,३७४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात १०,२२६ मुले तर १००९५ मुलींनी परिक्षा दिली. यापैकी ८,३१६ मुले व ८,७५८ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८१.३२ असून मुलींची टक्केवारी ८४.७६ आहे. त्यात मुली ३.४४ टक्क्यांनी समोर आहेत. निकालात भंडारा जिल्ह्यातून लाखनी तालुका अव्वल तर तुमसर तालुका पिछाडीवर आहे.
१०० टक्के निकालाच्या शाळा
आॅर्डनन्स फॅक्टरी सेंकडरी स्कुल जवाहरनगर, जेसीस इंग्लिश हायस्कूल भंडारा, अंकुर विद्या मंदिर भंडारा, युनायटेड कॉन्व्हेंट ठाणा जवाहरनगर, विद्याविहार मंदिर लाखांदूर, हायसिंथ लिटील फ्लॉवर स्कूल गडेगाव ता.लाखनी, पवन पब्लिक हायस्कूल पवनी, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा खापा (खुर्द) ता. तुमसर, सेंट जॉन मिशन इंग्लिश मिडीअम हायस्कुल तुमसर, मातोश्री विद्यामंदिर तुमसर शाळेचा समावेश आहे.
१७,०७४ विद्यार्थी उत्तीर्ण
जिल्ह्यातील २८६ शाळेचे २०,३२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात २,$$४९६ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, ६,१५७ प्रथम श्रेणीत, ६,७०३ द्वितीय श्रेणीत आणि १,७१८ विद्यार्थी असे एकूण १७,०७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. भंडारा तालुक्याचा निकाल ८६.५८ टक्के आहे. ५७ शाळेतून ४,५४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १,९५६ मुले तर १,९८१ मुली असे एकूण ३,९३७ विद्यार्थी यशस्वी झाले. (प्रतिनिधी)
दहावीच्या निकालात मुलींची भरारी
भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल सोमवारी दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित केला. जिल्ह्याचा निकाल ८४.०२ टक्के लागला.
लाखनी तालुक्याचा निकाल सर्वाधिक ८९.७७ टक्के इतका आहे. या तालुक्यात २५ शाळेतून १,६७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ७९४ मुले व ७०७ मुली असे एकूण १,५०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. भंडारा तालुक्याचा निकाल ८६.५८ टक्के आहे. ५७ शाळेतून ४,५४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १,९५६ मुले तर १,९८१ मुली असे एकूण ३,९३७विद्यार्थी यशस्वी झाले.
साकोली तालुक्याचा निकाल ८६.८० टक्के आहे. ४२ शाळेतून २,८०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये १,१९२ मुले तर १,२४० मुली असे एकूण २,४३२ विद्यार्थी उर्तीर्ण झाले. लाखांदूर तालुक्याचा निकाल ८५.३१ टक्के आहे. ३५ शाळांमधून २,२६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ८७० मुले तर १,०६४ मुली असे एकूण १,९३४ विद्यार्थी उर्तीर्ण झाले. पवनी तालुक्याचा निकाल ८२.५२ टक्के आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल एका टक्याने घसरला आहे. ४० शाळेतून २,८२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये १,०९९ मुले तर १,२३३ मुली असे एकूण २,३३२ विद्यार्थी पास झाले. तुमसर तालुक्याचा निकाल ७७.६४ टक्के आहे. ५३ शाळेतून ३,७६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये १,४२० मुले तर १,५०४ मुली असे एकूण २,९२४ विद्यार्थी उर्तीर्ण झाले.
मोहाडी तालुक्याचा निकाल ८२.५१ टक्के आहे. ३३ शाळांमधून २,४४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ९८५ मुले तर १,०२९ मुली असे एकूण २,०१४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
बारावीतही मुलींची सरशी
दहा दिवसांपूर्वी जाहिर झालेल्या बारावीच्या निकालातही जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली होती. मागील पाच वर्षांपासून जिल्ह्याच्या निकालात मुलींनीच आघाडी घेतली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी सच्चिंद्रप्रताप सिंह यांच्या काळात कापीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. त्यावेळी निकाल घसरला होता. (प्रतिनिधी)