उमरेड-कर्‍हांडला अभयारण्यात वाढली वन्यप्राण्यांची संख्या

By Admin | Updated: June 7, 2014 23:45 IST2014-06-07T23:45:37+5:302014-06-07T23:45:37+5:30

जंगलातील झाडे कापण्यावर प्रतिबंध, प्राणी चराईवर बंदी, जंगलातून सरपन आणण्यावर बंदी, जंगली प्राण्याच्या शिकारीवर बंदी, जंगला विषयी, प्राण्याविषयी ग्रामीण जनतेत केलेली जनजागृती आदी

The number of wild animals grown in Umaraad-Karhandal forest | उमरेड-कर्‍हांडला अभयारण्यात वाढली वन्यप्राण्यांची संख्या

उमरेड-कर्‍हांडला अभयारण्यात वाढली वन्यप्राण्यांची संख्या

गोसेबुज : जंगलातील झाडे कापण्यावर प्रतिबंध, प्राणी चराईवर बंदी, जंगलातून सरपन आणण्यावर बंदी, जंगली प्राण्याच्या शिकारीवर बंदी, जंगला विषयी, प्राण्याविषयी ग्रामीण जनतेत केलेली जनजागृती आदी कारणामुळे उमरेड-कर्‍हांडला अभयारण्यांतर्गत येणार्‍या पवनी वन्यजीव परिक्षेत्रात पहिल्याच वर्षी सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागले आहेत.
पहिले वर्ष या अभयारण्यातील जंगलाचे संरक्षण करण्यातच गेले. केलेल्या उपयोजनांमुळे जंगलातील वन्यप्राण्यांची संख्या मोठय़ा संख्येने वाढण्यास सुरुवात झाली आहे. येणार्‍या दिवसात हे अभयारण्य विदर्भातील एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून समोर येणार आहे. जागतिक पर्यावरण दिवसानिमित्ताने अभयारण्याच्या अधिकार्‍यांनी पत्रकारांसोबत या अभयारण्याला भेट दिली असता सकारात्मक परिणाम दिसून आले. या भेटीदरम्यान या अभयारण्यात मोठय़ा संख्येने हरिण, सांबर, चित्तळ, बायसन, नीलगाय, जंगली डुकरांचे कळप, मोरांचे थवे दिसून आले. रस्त्यावर वाघ व बिबट्याचे जाण्याचे पगमार्क दिसले.
या अभयारण्यात खापरी गेटमधूनच वन्यजीव प्रेमी, पर्यटकांना प्रवेश देण्यात येत आहे. या अभयारण्यात फिरण्याकरिता ४0 किलोमीटर रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. हे पवनी वन्यजीव वनक्षेत्र ५0 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे. पावसाळ्यात पाणी वाहून जाण्याकरिता रस्त्यांवर अनेक ठिकाणी पुलांची, रपट्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जंगली प्राण्यांना पिण्याकरिता पाणी मिळावे म्हणून जागोजागी कृत्रिम पानवठे तयार करण्यात आले आहेत. जंगलात अगोदरच पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत, तलाव आहेत. पक्ष्यांना पिण्याकरिता मडक्यात पाण्याची व्यवस्था जागोजागी करण्यात आली आहे.
डोंगर महादेव रस्त्यावर तयार करण्यात आलेल्या पानवठय़ावर, कोरंभीच्या जवळील चंडीका मातेच्या उगम स्थानावरील तलावावर, गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरवर, खापरीच्या तलावावर, पाहुणगाव जवळील शांत भत्तनसरा तलावाजवळ, रानाई तलाव आदी स्थानांवर वन्यप्राण्यांचे मोठय़ा संख्येने कळप पाणी पिण्यासाठी येत आहेत. या पाईंटवर हमखास वन्यप्राणी दिसतात. या शेटीत या पाईंटवरच वन्यप्राणी दिसून आले. या दौर्‍यात वनक्षेत्र अधिकारी व्ही.जे. गायकवाड, वनक्षेत्र सहायक वाय.एस. शेंदरे, जी.एस. शेगावकर यांच्या सोबत महादेव शिवरकर, लक्ष्मीकांत तागडे, प्रशांत पिसे, भागवत आकरे, ब्रह्मदास बागडे, प्रकाश पचारे, शेंडे आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: The number of wild animals grown in Umaraad-Karhandal forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.