The number of active patients exceeds ten thousand | ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दहा हजार पार

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दहा हजार पार

मंगळवारी ९ हजार २४३ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. यापैकी भंडारा तालुक्यात ४६०, माेहाडी १०६, तुमसर १७६, पवनी १२६, लाखनी १११, साकाेली १५४, लाखांदूर १०२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार ९८२ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून त्यापैकी १९ हजार ६४६ रुग्णांनी काेराेनावर यशस्वी मात केली आहे.

बाॅक्स

आणखी बाराजणांचा मृत्यू

जिल्ह्यात मृत्यूचे तांडव सुरू असून मंगळवारी आणखी १२ जणांच्या मृत्यूची नाेंद झाली असून त्यात भंडारा तालुक्यातील ७, तुमसर, पवनी, लाखांदूर, माेहाडी आणि साकाेली तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. भंडारा तालुक्यातील ७ पैकी दाेन महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४४८ जणांचा काेराेनाने मृत्यू झाला. त्यात भंडारा तालुक्यातील २२०, माेहाडी ३८, तुमसर ७०, पवनी ४८, लाखनी २२, साकाेली ३० आणि लाखांदूर तालुक्यातील २० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याचा मृत्युदर १.४५ टक्के आहे.

Web Title: The number of active patients exceeds ten thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.