जिल्ह्यात आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:58+5:302021-07-08T04:23:58+5:30

भंडारा : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता पूर्णत: ओसरत असून, जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे. बुधवारी ...

The number of active patients in the district is now 16 | जिल्ह्यात आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १६ वर

जिल्ह्यात आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १६ वर

भंडारा : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता पूर्णत: ओसरत असून, जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे. बुधवारी जिल्ह्यात केवळ १६ ॲक्टिव्ह रुग्ण होते, तर पाच जण कोरोनामुक्त आणि एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आला.

एप्रिल महिन्यातील कोरोना संसर्गाच्या हाहाकारानंतर आता आरोग्य यंत्रणेसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. गत महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. गत आठ दिवसांत तीन दिवस कोरोना रुग्णसंख्या निरंक आढळून आली होती. रुग्णसंख्या कमी होत असताना बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. भंडारा, तुमसर व साकोली तालुक्यात प्रत्येकी तीन, पवनी २, लाखनी ४ आणि लाखांदूर येथे १ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मोहाडी तालुक्यात एकही रुग्ण नाही. दरम्यान बुधवारी ८०१ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात केवळ एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आला. तो साकोली तालुक्यातील आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ४८८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ११२९ जणांचा मृत्यू झाला. तर ५८ हजार ३४३ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आरोग्य यंत्रणेला दिलासा

n कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत प्रचंड तणावात असलेल्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला गत १५ दिवसांपासून मोठा दिलासा मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या अत्यल्प येत असून, बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटल्याने आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण कमी झाला आहे. मात्र नागरिक नियमांचा फज्जा उडवीत असल्याचे दिसत आहेत.

Web Title: The number of active patients in the district is now 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.